Crime News : गुरुग्राममधील इस्लामपूर गावच्या एका पीजीमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून, तरुणीच्या आईने तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर हत्येचा आरोप केला आहे. तनिषा असे या मृत तरुणीचे नाव असून, ती मूळची उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जलालपूर गावाची रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती चेतन शर्मा या तिच्या अनेक वर्षांच्या मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये गुरुग्रामच्या सेक्टर 38 मध्ये राहात होती, जो स्वतः एटा जिल्ह्याचाच रहिवासी आहे.
ADVERTISEMENT
शेजाऱ्याने खिडकीतून पाहिलं अन्....
खासगी कंपनीत कामाला असलेला चेतन शुक्रवारी (25 सप्टेंबर) दुपारी कामावर गेला होता. त्यावेळी तनिषाने त्याला फोन केला, मात्र कामाच्या गडबडीत तो फोन उचलू शकला नाही. नंतर जेव्हा त्याने तिला परत फोन केला, तेव्हा तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार फोन करूनही उत्तर न मिळाल्याने चेतनने त्यांचा शेजारी अनुज याला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. अनुजने खिडकीतून पाहिले असता तनिषा पंख्याला लटकलेली दिसली आणि घराचा दरवाजा आतून बंद होता. यानंतर त्वरित पोलिसांना आणि तनिषाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा : विवाहित महिलेचा चुलत भावावर जडला जीव, पण संसार थाटण्याचं स्वप्न जळून खाक!
लिव्ह-इनमध्ये राहात असल्याची पूर्वकल्पना नाही
याप्रकरणी तनिषाच्या आईने पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली असून, चेतननेच तनिषाची हत्या करून हे प्रकरण आत्महत्या भासवण्यासाठी तिचा मृतदेह पंख्याला लटकवल्याचा गंभीर आरोप केला आहे. गुरुग्राममध्येच राहणाऱ्या तनिषाच्या बहिणीने माहिती दिली की, आदल्या रात्री तिचे तनिषाशी नेहमीप्रमाणे बोलणे झाले होते आणि ती अगदी ठीक वाटत होती. विशेष म्हणजे, तनिषा चेतनसोबत लिव्ह-इनमध्ये राहात असल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली असून, पोलिस या सर्व आरोपांची बारकाईने तपासणी करत आहेत.
हे ही वाचा : फडणवीसांच्या निर्णयावर शेतकरी रोखठोक, काय म्हणाले?
हत्या की आत्महत्या?
पोलिसांनी तनिषाचा मृतदेह ताब्यात घेऊन डॉक्टरांच्या पथकाकडून त्याचे शवविच्छेदन (पोस्ट-मार्टम) करून घेतले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी, कुटुंबीयांच्या हत्येच्या आरोपाची सखोल चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आणि कुटुंबीयांची तक्रार यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या पोलिस या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांचा कसून तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












