शेतातील विहिरीत पोत्यात काहीतरी गुंडाळलेलं दिसलं, जवळ जाताच सगळे हादरले!

मुंबई तक

• 10:45 AM • 27 Sep 2026

bihar crime news : बिहारमधील रोहतासमध्ये प्रेमविवाहाच्या दोन महिन्यांनंतर 16 वर्षीय लक्ष्मी कुमारीचा संशयास्पद मृत्यू झाला. डूमरखोह जंगलातील विहिरीत बोऱ्यात तिचा मृतदेह आढळल्यानंतर पतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

bihar crime news

bihar crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शेतातील विहिरीत पोत्यात काहीतरी गुंडाळलेलं दिसलं

point

जवळ जाताच सगळे हादरले!

bihar crime news : बिहारमधील रोहतासमध्ये प्रेमविवाहाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बड्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डूमरखोह जंगलातील विहिरीत बांधलेल्या पोत्यात लक्ष्मी कुमारीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती पिंकू बिंद आणि धनजी पासी या दोघांना अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा कहर, मुंबई-नाशिक महामार्गावर तब्बल 15 किमी ट्रॅफिक जाम!

अल्पवयीन मुलीने प्रेमविवाह केला, पण दोन महिन्यात बॉडी सापडली 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी लक्ष्मी कुमारी ही बिक्रमगंजमधील मानी गावातील मंटु राम यांची मुलगी होती. पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मी अल्पवयीन होती आणि तिचं वय 16 वर्षे होतं. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तिचं बड्डी येथील 20 वर्षीय पिंकू बिंद याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर लक्ष्मी बड्डी परिसरात राहू लागली होती. काही काळापूर्वी ती बड्डी येथे तिच्या मावशीकडे आली होती. याच काळात तिची पिंकूशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत

मृतदेह कथितपणे  पोत्यात गुंडाळून जंगलातील विहिरीत फेकण्यात आला

लग्नानंतर पिंकू लक्ष्मीला डूमरखोह जंगलात घेऊन गेला होता, असं सांगितलं जात आहे. त्यानंतर लक्ष्मीचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह कथितपणे  पोत्यात गुंडाळून जंगलातील विहिरीत फेकण्यात आला. ग्रामस्थांना विहिरीत पोत्यात मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था खराब असल्याने त्याच्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पीएमसीएचच्या फॉरेन्सिक विभागात पाठवला जाण्याची माहिती देण्यात आली आहे.

लक्ष्मीचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिच्या मृत्यूमागील कारण आणि मृतदेह विहिरीत नेऊन टाकण्यामागील परिस्थितीचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात पती पिंकू बिंद आणि धनजी पासी यांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. रोहतासचे एसपी मिस्टर राज यांनी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह दोघांना अटक केल्याचं सांगितलं आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.