Crime News : लाईट लावण्यावरून सावत्र मुलाचे आणि आईचे वादात रुपांतर झाले होते. तरुणाने दारू पिऊन सावत्र आईवर चाकूने सपासप वार केल्याचा आरोप आहे. मांडी, कंबर, छाती आणि मानेवर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी गुरप्रीत कौर यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. घडलेल्या घटनेनुसार, ही घटना बुधवारी रात्री सुमारे साडे सात वाजण्याच्या सुमारास पंजाबच्या तरन तारन येथे घडली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 13 वर्षीय आदिवासी मुलीचे अपहरण, नंतर केला लैंगिक अत्याचार
सावत्र आईचा मुलाकडून खून
संबंधित प्रकरणात कुटुंबियांच्या म्हणण्यांनुसार, लवप्रीत सिंग दारू पिऊन घरी परतला. नंतर काही वेळात, त्याने पत्नी मलकीत कौरसोबत वाद झाले होते. सुमारे 10 मिनिटांनंतर, तो खाली परत आला आणि त्याची सावत्र आई गुरप्रीत कौरसोबत त्याचा वाद झाला. या वादादरम्यान, त्याने चाकूने गुरप्रीत कौरवर वारंवार वार केले. संबंधित प्रकरणात घटनेवेळी घरातील सदस्य उपस्थित होते. मृत महिलेची मुलगी हरमल कौलने सांगितलं की, तिने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, ती गंभीर जखमी झाली होती.
रोजच्या दैनंदिन गोष्टीवरून वाद विकोपाला
हरकमलच्या म्हणण्यांनुसार, चाकूच्या जखमांमुळे त्याच्या आईची प्रकृती अधिकच खालावली आणि काही वेळांतच तिचा मृत्यू झाला. रोजच्या दैनंदिन गोष्टीवरून वाद विकोपाला जाऊन कौटुंबिक हानी झाली.
हे ही वाचा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार, तिघांच्या आवळल्या मुसक्या
दरम्यान, कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, लवप्रीत आणि गुरप्रीत यांच्यात अनेकदा क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, लवप्रीत रात्री उशिरा दारू पिऊन घरी यायचा आणि लाईट चालूच ठेवायचा. अशातच गुरुप्रीत लाईट लावण्यापासून त्याला सतत विरोध करायची यातून रक्तरंचित थरार घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT












