आईसह दोन वर्षीय चिमुरडी आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत, फ्लॅटमध्ये 10 वर्षांच्या मुलीला काय दिसलं?

मुंबई तक

• 08:33 AM • 28 Sep 2026

गाझियाबादच्या खोडा परिसरातून एक अत्यंत संशयास्पद घटना समोर आली आहे. भरत नगरमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एक महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. महिलेच्या 10 वर्षांच्या भाचीने त्यांना सर्वप्रथम खिडकीतून पाहिले.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आईसह दोन वर्षीय चिमुरडी आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत

point

फ्लॅटमध्ये 10 वर्षांच्या मुलीला काय दिसलं?

Crime News : गाझियाबादमधील भारत नगरमध्ये शुक्रवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एका महिलेचा आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघींचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी ही घटना संशयास्पद मानून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 30 वर्षीय अनिरुद्ध ऊर्फ सोनू हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत भारत नगरमधील गल्ली क्रमांक सातमध्ये गेल्या चार वर्षांपासून भाड्याने राहत होता. अनिरुद्ध एका खाजगी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी गृहिणी होती.

हे वाचलं का?

10 वर्षांची मुलगी फ्लॅटवर गेली अन्...

शुक्रवारी अनिरुद्धची तब्येत खराब असल्याने तो कामावर गेला नव्हता. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तो औषध आणण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळाने खाली राहणाऱ्या त्याच्या बहिणीची 10 वर्षांची मुलगी फ्लॅटवर गेली. तिने दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्या मुलीने खिडकीतून आत डोकावून पाहिले आणि आतील दृश्य पाहून तिने किंकाळी फोडली. मुलीने आपल्या आईला आणि शेजाऱ्यांना याबद्दल सांगितले. नागरिकांनी खिडकीतून पाहिले असता महिला आणि तिची चिमुकली गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. 

हे ही वाचा : उमरखेड हादरले! वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट, दोघांचा करुण अंत

नवऱ्याला ताब्यात का घेतलं?

दरम्यान, अनिरुद्ध औषध घेऊन घरी परतला. फ्लॅटबाहेर गर्दी पाहून तो घाबरला आणि घटनेची माहिती मिळताच तो जमिनीवर कोसळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये कोणत्याही मोठ्या वादाची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. शेजारी आणि नातेवाइकांनीही त्यांच्यात कोणतेही मोठे भांडण नसल्याचे सांगितले आहे. मात्र, पोलीस कोणत्याही शक्यतेला नाकारत नाहीत. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले असून तिथे कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस सध्या हत्या, आत्महत्या आणि कौटुंबिक कलह अशा विविध बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा : भिवंडी : 'माझ्या मुलाला फाशी द्या', लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीच्या आईची मागणी

हत्या की आत्महत्या?

पोलिसांनी सांगितले की, खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पतीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. हत्या, आत्महत्या आणि कौटुंबिक वाद यासह प्रत्येक कोनातून तपास केला जात आहे. महिलेच्या माहेरच्या लोकांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते आल्यानंतर आणि शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील स्थिती अधिक स्पष्ट होईल.