Crime News : केरळच्या पालक्काड जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मद्यधुंद व्यक्तीने सावत्र वडिलांवर चाकूने सपासप वार करून हत्या केली. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेत मृत व्यक्तीची विनोद (वय 38) अशी ओळख समोर आली. तर सावत्र मुलाची ओळख सतीश अशी पटली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लाईट लावण्यावरून सावत्र आईची मुलाकडून हत्या, मांडी, कंबर, छाती आणि मानेवर गंभीर जखमा
मुलाने दारूवरून सावत्र बापाला संपवलं
संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांनी सांगितली असता, शनिवारी सायंकाळी विनोद त्याच्या सावत्र मुलगा सतीश घरी एकत्र दारू पीत होते. सायंकाळी 7: 30 वाजण्याच्या सुमारास दारू घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. याच कारणावरून वाद विकोपाला गेला असता, संतापलेल्या सतीशने विनोदला त्यांच्या घराच्या अंगणात पकडले होते. त्याने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला वारंवार चाकूने वार केले होते. नंतर त्याने बेदम मारहाण देखील केली होती.
छातीच्या डाव्या बाजूला वारंवार चाकूने वार
दोघांमधील वाद इतके विकोपाला गेले असता, संतापलेल्या विनोदला त्याच्या घराच्या अंगणात पकडले. त्याने त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला वारंवार चाकूने वार केले. या प्रकरणात विनोदचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली. आरोपी सतीश हा गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला होता.
हे ही वाचा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार, तिघांच्या आवळल्या मुसक्या
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस ठाण्यातील पोलीस तात्काळपणे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सतीशला पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू ठेवली आहे. नंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह हा कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.
ADVERTISEMENT












