रीलमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन, चोरटे थेट मागच्या दारातून घरात शिरले अन्...

मुंबई तक

• 11:41 AM • 27 Sep 2026

Crime News : कन्याकुमारीमध्ये YouTuberच्या घरातून 118 सॉव्हरेन म्हणजेच सुमारे 944 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली. सोशल मीडियावर दाखवलेल्या संपत्तीमुळे चोरट्यांना घरातील मौल्यवान वस्तूंची माहिती मिळाली होती का, याचा पोलीस तपास करत आहेत.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रीलमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन

point

चोरटे थेट मागच्या दारातून घरात शिरले अन्...

Crime News : तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे YouTuber विनोद कुमार यांच्या घरात चोरी झाली असून 944 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून ते सोन्याच्या दागिन्यांचे आणि पैशांचे प्रदर्शन करत होते. त्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्यानं वेगळीच चर्चा रंगली आहे. पोलिसांकडून या दिशेनेही तपास केला जात आहे. नेमकं काय घडलंय? समजून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हेही वाचा : खासदार बाळ्या मामांच्या मतदारसंघात वाहतूक कोंडीचा कहर, मुंबई-नाशिक महामार्गावर तब्बल 15 किमी ट्रॅफिक जाम!

घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार

कन्याकुमारी जिल्ह्यातील थम्माथुकोनम परिसरातील VIP Garden येथे YouTuber विनोद कुमार हे पत्नी मधुमिता यांच्यासोबत राहतात. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दक्षिण भारतात सोन्याचे वजन सांगण्यासाठी ‘सॉव्हरेन’ हा शब्द वापरला जातो. एक सॉव्हरेन सुमारे 8 ग्रॅम असतो. त्यामुळे 118 सॉव्हरेन सोन्याचे वजन सुमारे 944 ग्रॅम होते.

हेही वाचा : आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत

परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात

चोरीची माहिती मिळताच राजक्कमंगलम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी केली असून परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरटे किती जण होते, ते घरात नेमके कधी शिरले आणि कोणत्या मार्गाने आले व गेले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घरात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी मागील दरवाजाच का निवडला, याचाही तपास केला जात आहे. CCTV फुटेजच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणात सोशल मीडिया पोस्टचाही तपासाचा एक भाग करण्यात आला आहे. विनोद कुमार आणि मधुमिता हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दाखवणारे व्हिडीओ पोस्ट करत होते. त्यामुळे घरात मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू असल्याची माहिती चोरट्यांना सोशल मीडिया पोस्टमधून मिळाली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. चोरट्यांनी चोरीपूर्वी घराची पाहणी केली होती का किंवा अचानक चोरी केली, हेही तपासले जात आहे. सध्या कोणत्याही आरोपीची ओळख किंवा अटक झाल्याची माहिती समोर आलेली नाही. CCTV फुटेज, घटनास्थळावरील सुराग आणि परिसरातील हालचालींच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.