छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीने आत्महत्या का केली? ‘ते’ प्राथमिक कारण चर्चेत

actress sanchita ugale suicide case : ‘छावा’ चित्रपटात काम केलेल्या 22 वर्षीय टीव्ही अभिनेत्री संचिता उगाले हिने नालासोपारा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

actress sanchita ugale suicide case

actress sanchita ugale suicide case

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 03:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीने आत्महत्या का केली?

point

‘ते’ प्राथमिक कारण चर्चेत

actress sanchita ugale suicide case : नालासोपारा येथील आचोले भागात राहणाऱ्या 22 वर्षीय टीव्ही अभिनेत्री संचिता उगाले हिने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात आणि स्थानिक परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. संचिता आपल्या आई-वडिलांसह आणि 15 वर्षांच्या धाकट्या बहिणीसोबत राहत होती. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिची बहीण अंजली घराबाहेर गेली असताना, घरात कोणीही नसताना संचिताने आपल्या बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने सीलिंग फॅनला गळफास घेतला.

हे वाचलं का?

हेही वाचा : 20 तासांपूर्वीची पोस्ट पाहून विश्वास बसणार नाही, छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या

काम मिळत नसल्याने नैराश्यात होती? 

संचिताने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून तिला अभिनय क्षेत्रात काम मिळत नव्हते. कामाच्या कमतरतेमुळे ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात होती, अशी चर्चा आता सिनेवर्तुळात रंगली आहे. तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : वसई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गळ्याला दोर लावला, नेमकं कारण काय?

छावा सिनेमात साकारली होती ताराबाईंची भूमिका 

अभिनय क्षेत्रात संचिताने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती.. तिने लोकप्रिय टीव्ही मालिका 'दिलवाली दुल्हा ले जाएगी'मध्ये 'सुकून' ही मुख्य भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने 'कुमकुम भाग्य' आणि 'वागले की दुनिया' यांसारख्या अत्यंत चर्चित मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. इतकेच नाही, तर बहुचर्चित 'छावा' चित्रपटात तिने 'ताराबाई'ची महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिच्या निधनामुळे एका होतकरू अभिनेत्रीचा प्रवास अकाली थांबला आहे.

या प्रकरणी आचोले पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 194 अंतर्गत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा विविध पैलूंनी तपास करत आहेत. आत्महत्या करण्यामागे नेमके नैराश्य कारणीभूत होते का, की अन्य काही कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारणे आहेत, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस तिच्या जवळच्या सहकाऱ्यांची आणि कुटुंबीयांची चौकशी करणार आहेत. संचिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.