साडी नेसलेल्या महिलेला रेस्तराँमध्ये नाकारला प्रवेश, कारण…; व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबई तक

• 12:46 PM • 22 Sep 2021

समाज माध्यमं अर्थात सोशल मीडियावर कधी कोणता मुद्दा चर्चेत येईल सांगता येत नाही. एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की सोशल मीडियावर घमासान बघायला मिळतं. हे सगळं आता सांगण्याचं निमित्त म्हणजे असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. घटना आहे दिल्लीतील! ट्विटरवर अचानक #saare ट्रेडिंग झालं आणि सगळ्यांचं लक्ष याकडे वेधलं गेलं. तर व्हायरल […]

Mumbaitak
follow google news

समाज माध्यमं अर्थात सोशल मीडियावर कधी कोणता मुद्दा चर्चेत येईल सांगता येत नाही. एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की सोशल मीडियावर घमासान बघायला मिळतं. हे सगळं आता सांगण्याचं निमित्त म्हणजे असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.

हे वाचलं का?

घटना आहे दिल्लीतील! ट्विटरवर अचानक #saare ट्रेडिंग झालं आणि सगळ्यांचं लक्ष याकडे वेधलं गेलं. तर व्हायरल व्हिडीओ केलेल्या आरोपानुसार एका महिलेला साडी नेसलेली असल्यानं रेस्ताँमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

साडी नेसलेली असल्यानं आपण रेस्तराँमध्ये जाऊ शकत नाही, असं या महिलेला रेस्तराँतील कर्मचाऱ्याकडून सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेस्तराँवर लोक भडकले आहे.

ट्विटरवर @anitachoudhary नावाच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ केवळ १६ सेकंदाचाच असून, त्यात अक्विला रेस्तराँच्या कर्मचाऱ्याने त्यांना साडी नेसलेली असल्याने रेस्तराँमध्ये जाऊ शकत नाही, असं म्हटलं.

हा व्हिडीओ ट्वीट करून अनिता चौधरी यांनी म्हटलं आहे की, ‘अक्विला रेस्तराँमध्ये साडी नेसून जाण्याची परवानगी नाही. कारण भारतीय साडी आता स्मार्ट पोशाख नाहीये. स्मार्ट पोशाखाची नक्की व्याख्या काय? मला सांगा. कृपया स्मार्ट पोशाख कशाला म्हणायचं हे मला स्पष्ट करून सांगा म्हणजे मी साडी नेसायचं बंद करेन’, असं या महिलेनं ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे.

हा व्हिडीओ २० सप्टेंबर रोजी ट्वीट करण्यात आला होता. मात्र, आज म्हणजेच २२ सप्टेंबरला ट्रेंडिंगमध्ये आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

‘कोणते कपडे परिधान करावेत आणि कोणते करू नयेत’, असा सवाल काहीजणांनी उपस्थित केला आहे. हे खरं असेल तर खूपच वाईट आहे, असंही काही जणांनी म्हटलं आहे. अनेकांनी रेस्तराँला निगेटिव्ह रेटिंग देत आपला राग व्यक्त केला आहे.

    follow whatsapp