उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख, स्पष्टीकरण देत म्हणाले…

मुंबई तक

• 02:11 PM • 15 Jan 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलत असताना लॉकडाऊन लागेल का ? असा प्रश्न विचारला असता त्याबाबत अंतिम काय तो निर्णय आहे तो मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील असं वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देत आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी […]

Mumbaitak
follow google news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलत असताना लॉकडाऊन लागेल का ? असा प्रश्न विचारला असता त्याबाबत अंतिम काय तो निर्णय आहे तो मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील असं वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देत आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य ठाकरे हे जे म्हणालो ते वक्तव्य मागे घेतो मला उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं म्हणायचं होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष
नेमका कधी आणि कसा सुरू झाला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केलं. राज्य सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यात कोणताही बद केला गेलेला नाही. कोरोना रूग्ण वाढत आहेत मात्र कोरोना रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे आपण रात्रीची संचारबंदी ठेवली आहे. जर कोरोना रूग्णांची जास्त वाढली आणि रूग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढलं ऑक्सिजनचा वापर वाढला तर त्या अनुषंगाने निर्णय घ्यावा लागेल.

आपण 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू केलं आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना लसीकरण केलं जातं आहे. आतापर्यंत 48 टक्के लसीकरण झालंय. जिल्ह्यात इतर जिल्ह्यासारखी परिस्थिती नाही. त 60 वर्षांच्या व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असं पवार म्हणाले.

बाहेरच्या देशात मोठी कोरोना लाट आलीये, मात्र मृत्यूदरात मात्र घट झाली आहे. राज्यात कोरोनामुक्ततेचं प्रमाण 95 टक्के आहे. मात्र तरीही बेड्स, जम्बो कोविड सेंटर,अण्णासाहेब मगर जम्बो हॉस्पिटल सगळी तयारी आपण करून ठेवली आहे, असं सांगतानाच मास्क नाही वापरला तर 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत 9 हजार 270 नागरिकांकडून 46 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क वापरा आणि सरकारला सहकार्य करा असं आवाहन मी सर्वांना करत आहे, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं. या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला होता. ज्याबाबत त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं आणि मला तसं म्हणायचं नव्हतं असं अजित पवार म्हणाले.

    follow whatsapp