कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका, ठाकरेंचा हॉटेल चालकांना इशारा

राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक महत्वाच्या भागात सरकारने लॉकडाउन जाहीर केलं असून काही भागांत संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यातील हॉटेलचालकांनाही राज्य सरकारने निर्बंध घालून दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:39 PM • 13 Mar 2021

follow google news

राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक महत्वाच्या भागात सरकारने लॉकडाउन जाहीर केलं असून काही भागांत संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यातील हॉटेलचालकांनाही राज्य सरकारने निर्बंध घालून दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, ५० टक्के क्षमतेने हॉटेल व रेस्टॉरंट चालवणं, स्वच्छता बाळगणं असे नियं सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्स संघटनाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाउन करुन सगळं बंद करणं आम्हालाही नकोय, पण मास्क घालणे व इतर नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. कडक निर्बंध लावण्यास आम्हाला भाग पाडू नका अशा शब्दांमध्ये इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त गर्दी झाली होती. अनेक हॉटेलमध्ये आजही नियमांचं पालन होत नसून अनेक ठिकाणी कर्मचारी मास्क न घालता वावरताना दिसतात. स्थानिक यंत्रणांना अशा लोकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १५ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले.

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात १५ हजारापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण

    follow whatsapp