अदर पूनावाला सुरक्षित भारतात येतील याची काळजी घ्या ! हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

लसीचा पुरवठा व्हावा म्हणून मिळत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना सुरक्षित भारतात येतील याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे असे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले आहेत. अदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी आपल्याला लसीचा पुरवठ्यावरुन धमकीचे फोन आणि दबाव येत असल्याचं सांगितलं होतं. धमकीचे फोन, बड्या लोकांकडून […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:34 AM • 02 Jun 2021

follow google news

लसीचा पुरवठा व्हावा म्हणून मिळत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांना सुरक्षित भारतात येतील याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे असे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले आहेत. अदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी आपल्याला लसीचा पुरवठ्यावरुन धमकीचे फोन आणि दबाव येत असल्याचं सांगितलं होतं.

हे वाचलं का?

धमकीचे फोन, बड्या लोकांकडून दबाव…अदर पूनावाला देशाबाहेर लस उत्पादन करण्याच्या विचारात

अशा वातावरणात आपल्याला सध्या भारतात राहणं योग्य वाटत नसल्याचंही पूनावाला म्हणाले होते. बॉम्बे हायकोर्टाच्या व्हेकेशन बेंचसमोर पूनावालांच्या सुरक्षेसंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी झाली. “लसची निर्मिती करुन पुनावाला हे चांगल्या रितीने देशसेवा करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्वोच्च सुरक्षा यंत्रणांनी त्यांना भारतात सुरक्षित पद्धतीने आणून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे”, असे आदेश जस्टीस एस.एस.शिंदे आणि जस्टीस अभय अहुजा यांच्या खंडपीठाने दिले.

भारतातलं Vaccination दोन-तीन महिन्यांमध्ये होणं शक्य नाही- अदर पूनावाला

दत्ता माने या वकीलाने अदर पूनावाला यांना Z + सुरक्षा मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करत असताना खंडपीठाने राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी यासंबंधी पूनावाला यांच्याशी स्वतः संवाद साधायला हवा. केंद्र सरकारने याआधीच पूनावाला यांना Y दर्जाची सूरक्षाव्यवस्था पुरवली आहे. काही राजकारणी पूनावाला यांच्याकडे लसीच्या पुरवठ्यावरुन सारखा तगादा लावत आहेत. याच दबावसत्रामुळे अदर पूनावाला भारत सोडून लंडनला गेल्याचं दत्ता माने यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारकडून बाजू मांडताना वकीलांनी पूनावाला यांना आधीच Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवान आणि राज्य पोलीस दलातील दोन बंदुकधारी जवान पूनावाला यांच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात आहेत. सध्याच्या परिस्थिती पाहता पूनावाला जेव्हा भारतात परततील तेव्हा त्यांना Z + सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचा राज्य सरकार आढावा घेत असल्याचं सांगितलं.

…तर माझं मुंडकं कापलं जाईल ! अदर पूनावालांनी व्यक्त केली भीती

सरकारी पक्षाने मांडलेल्या बाजूनंतर खंडपीठाने आपली भूमिका मांडत सरकारमधील उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पुनावाला यांच्याशी बोलणं गरजेचं आहे असं सांगितलं. “मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं. जर पूनावाला यांचा कशाची काळजी वाटत असेल तर सरकारने त्यांच्याशी बोलायला हवं. ते ज्यावेळी महाराष्ट्रात परततील त्यावेळी सरकारने त्यांच्याशी बोलून त्यांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था करायला हवी.”

सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांचे लसीच्या उत्पादनाबाबत दावे ठरत आहेत फोल?

    follow whatsapp