‘Uddhav ठाकरे जंटलमन, मनात कपटीपणा नाही’, माजी CM कडून प्रचंड कौतुक

मुंबई तक

09 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

मुंबई: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूपच जंटलमन आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव कमी होता. पण ते खुलापणाने सांगायचे की, मला प्रशासनाचा अनुभव कमी आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो. कधी आमचं ऐकायचे तर कधी राष्ट्रवादीचं ऐकायचे. परंतु ते खरंच जंटलमन आहेत, असं म्हणतं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूपच जंटलमन आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव कमी होता. पण ते खुलापणाने सांगायचे की, मला प्रशासनाचा अनुभव कमी आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो. कधी आमचं ऐकायचे तर कधी राष्ट्रवादीचं ऐकायचे. परंतु ते खरंच जंटलमन आहेत, असं म्हणतं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. (Ex. CM and Congress leader Ashok Chavan gratitude to ex cm Uddhav Thackeray)

हे वाचलं का?

विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मुंबई तक ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्यजीत तांबे यांची बंडखोरी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात सुरु असलेला संघर्ष अशा विविध विषयावर भाष्य केलं.

Rahul Kalate यांनी अर्ज मागे घेतला नाही तरी… अश्विनी जगताप यांचा मोठा दावा

अशोक चव्हाण उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना काय म्हणाले?

महाविकास आघाडी टिकवायची असेल तर अधिक समन्वय, पारदर्शकता, संवाद आणि एकमेकांबद्दल मानसन्मान हवा. अजून काय हवं? मी पण सीनियर आहे. तुम्ही पण सीनियर आहात. एकमेकांचा सन्मान राहिला पाहिजे.

‘समजा, काँग्रेस मविआमध्ये सामील झाली नसती तर सरकार बनलं असतं का? काँग्रेसमुळे सरकार बनलं ना? सोनिया गांधींची इच्छा नसताना शेवटी त्यांनी भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी एक निर्णय घेतला ना. पण सामील झाल्यावर काँग्रेसमुळे सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसला महत्त्व मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण तुलनेने आम्हाला थोडं कमीच महत्त्व मिळालं.’

Crime : पगारवाढ रोखल्याच्या रागातून वरिष्ठाची हत्या… पोलीस दलात खळबळ

‘खरं तुमची ताकद असताना तुम्ही कसं वागवता लोकांना हे पण महत्त्वाचं आहे ना. तुमची ताकद असताना तुम्ही लोकांना नीट वागवलं तुम्ही त्यांना लक्षात ठेवता. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना याबाबतीत मानलंच पाहिजे. ते खूपच जंटलमन आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव कमी होता. पण ते खुलापणाने सांगायचे की, मला प्रशासनाचा अनुभव कमी आहे हा अशोकराव… तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो. कधी आमचं ऐकायचे, तर कधी राष्ट्रवादीचं ऐकायचे. परंतु ते खरंच जंटलमन आहेत.’

‘मृदू स्वभाव, चांगला माणूस.. असा कपटीपणा उद्धव ठाकरेंमध्ये मी कधी पाहिला नाही. मी त्यांच्यासोबत काम केलंय.. हा अनुभव कमी जास्त यायचे कारण तीन पक्ष एकत्र होतो. परंतु सरकार आम्ही यशस्वीपणे चालवलं. आम्ही आणखी अडीच वर्ष सरकार चालवलं असतं हे जर बाकी लोकं पळून गेले नसते तर नक्कीच सरकार चाललं असतं.’ असं म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंकडून मिळणाऱ्या वागणुकीचं देखील कौतुक केलं.

    follow whatsapp