जगातला पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट, ‘छत्रपती ताराराणी’ प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या पुस्तकावर आधारीत छत्रपती ताराराणी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा जगातला पहिला हॉलिवूड चित्रपट आहे. छत्रपती ताराराणी ही भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. त्यांच्या शौर्याबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने हा चित्रपट प्लॅनेट मराठी घेऊन येतो आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ.सुधीर कदम यांचे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:14 PM • 08 Nov 2021

follow google news

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या पुस्तकावर आधारीत छत्रपती ताराराणी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा जगातला पहिला हॉलिवूड चित्रपट आहे. छत्रपती ताराराणी ही भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली आहे. त्यांच्या शौर्याबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने हा चित्रपट प्लॅनेट मराठी घेऊन येतो आहे.

हे वाचलं का?

या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ.सुधीर कदम यांचे असून चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे.आणि या चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. सोनालीने भाऊबीजेच्या दिवशी सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि गोल्डन रेशियो फिल्म्स यांच्या प्रयत्नातून यूनाइडेड किंग्डम मधील ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ ‘आणि ‘ओरेवो स्टुडिओ हे ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या सिनेमाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करण्याची पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी लंडन मध्ये होणार असून हा हॉलीवूडचा पहिला मराठी चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

हा चित्रपट आता मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत देखील चित्रित होणार त्यामुळे आता हा चित्रपट साता समुद्रापलीकडे पोहचणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्रेक्षक मोठ्या पडद्यावर अनुभवतील. लोकांसमोर आपल्या महाराष्ट्राची वीरगाथा आणून महाराष्ट्राचा इतिहास सातासमुद्रापलीकडे लोकांना कळवा या साठी प्लॅनेट मराठी आणि संपूर्ण चित्रपटाची टीम खूप मेहनत घेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर अनेक छत्रपतींनी केले. पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी. त्या वेळेच्या जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. अशा या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट 2022 च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. .

    follow whatsapp