पुणे : पुणे-नगर महामार्गावर ट्रकने कारसह दोन दुचाकींना उडवलं; पती-पत्नीसह 4 ठार

– स्मिता शिंदे, शिरुर पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना आज (२३ जानेवारी) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील २४वा मैलजवळ हा अपघात झाला असून, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका पतीपत्नीचा समावेश असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची अधिक माहिती अशी की, पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:17 PM • 23 Jan 2022

follow google news

स्मिता शिंदे, शिरुर

हे वाचलं का?

पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना आज (२३ जानेवारी) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील २४वा मैलजवळ हा अपघात झाला असून, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका पतीपत्नीचा समावेश असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची अधिक माहिती अशी की, पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील २४वा मैल येथे रविवारी (२३ जानेवारी) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ट्रकने एका कारसह दोन दुचाकींना धडक दिली. यात ४ जणांने प्राण गमवावे लागले.

ट्रक पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेला जात होता, तर कार आणि दोन दुचाकी अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. शिक्रापूर येथील २४वा मैलजवळ येताच भरधाव चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने गेला.

यावेळी पुण्याकडे निघालेल्या ईरटीका कारसह दोन दुचाकींना ट्रकने जोरदाराची धडक दिली. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील विठ्ठल हिंगाडे व रेश्मा हिंगाडे या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर तर कारमधील लिना निकसे या सुद्धा जागीच ठार झाल्या.

मृतांपैकी एकाचे नाव अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस आणि प्रशासनाकडून जखमींचीही ओळख पटवण्याचं काम सूरु आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडी

महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुभाजक तोंडून ट्रक विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस प्रशासनाने अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवलं आणि वाहतूक सुरळीत केली.

    follow whatsapp