मुंबई : बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली, घटनेचा व्हिडीओ आला समोर

सगळीकडे दहीहंडी जल्लोष सुरू असतानाच बोरिवलीत एक दुर्घटना घडली आहे. बोरिवलीतील साईबाबा नगरमध्ये इमारत दुर्घटनाग्रस्त झाली आहे. चार मजली गितांजली बिल्डिंग कोसळली असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली नागरिक दबले असल्याची माहिती आहे. सध्या ढिगाऱ्याखालील लोकांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. मुंबई : बोरिवलीतील इमारत केव्हा कोसळली? बोरिवली पश्चिममधील साईबाबा नगर परिसरात चार मजली इमारत दुपारी […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 07:57 AM • 19 Aug 2022

follow google news

सगळीकडे दहीहंडी जल्लोष सुरू असतानाच बोरिवलीत एक दुर्घटना घडली आहे. बोरिवलीतील साईबाबा नगरमध्ये इमारत दुर्घटनाग्रस्त झाली आहे. चार मजली गितांजली बिल्डिंग कोसळली असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली नागरिक दबले असल्याची माहिती आहे. सध्या ढिगाऱ्याखालील लोकांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

मुंबई : बोरिवलीतील इमारत केव्हा कोसळली?

बोरिवली पश्चिममधील साईबाबा नगर परिसरात चार मजली इमारत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जमीनदोस्त झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गितांजली बिल्डिंग ही चार मजली इमारत कोसळली आहे.

तुमची इमारत अतिधोकादायक आहे का… कसं ओळखाल?

इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या इमारत दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. ५ जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एकाला केईएम रुग्णालय, तर १ ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि पोद्दार रुग्णालयात प्रत्येकी १ जखमीवर उपचार करण्यात आले.

मुंबईतील ३३७ इमारती अतिधोकादायक; BMC ने यादीच केली जाहीर

१२ जखमींपैकी ५ जखमींना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला, तर ७ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बोरिवली : सकाळी बिल्डिंग खाली केली अन् दुपारी दुर्घटना झाली

धोकादायक झालेल्या गितांजली इमारतीला महापालिकेच्या आर मध्य विभागाने नोटीस दिली होती. परंतु रहिवासी न्यायालयात गेले होते. दरम्यान, आज सकाळी गितांजली इमारतीमधील रहिवाशांनी स्वतःच इमारत खाली केली. त्यानंतर दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान ही इमारत अचानक कोसळली. त्यावेळी सदर इमारतीमध्ये कुणीही रहिवासी नव्हते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बोरिवली : 35 वर्ष जुनी होती इमारत

साईबाबा मंदिराजवळ असलेली ही दुर्घटनाग्रस्त इमारत ३५ वर्ष जुनी होती. इमारत पुर्णपणे जर्जर झाली होती. त्यामुळे ती रिकामी करण्यात आली होती. या इमारतीमध्ये ५ कुटुंब राहत होती. सकाळी सामान न घेताच कुटुंबातील लोक इमारतीतून बाहेर पडले होते. सध्या अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, ३ वॉटर टँक, ८ रुग्णवाहिका आदी घटनास्थळी आहेत.

    follow whatsapp