Mumbai News : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरु असताना एक दुर्दैवी घटना घडली. मेट्रो स्टेशनचा स्लॅब थेट वाहनांवर कोसळला, या घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले, यापैकी एकाचा अंत झाला. ही घटना शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी घडली असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'x' ट्विटवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईतील मुलुंड मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दुर्घटनेत दोघेजण गंभीर जखमी
देवेंद्र फडणवीस यांचं 'X' वरील ट्विट जसंच्या तसं
'मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी', अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अशातच महापौर रितू तावडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया
'कामासाठी जे इंजिनियर्स ठेवले होते, त्यांनी कामावर लक्ष ठेवलं होतं का? या सगळ्याचीच प्रश्नचिन्हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यापुढील वॉल बसवताना काळजी घेणं गरजेचं आहे, पण आता हे का झालं? याची कारणं आता शोधावी लागणार आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सर्व माहिती देते', असं त्या म्हणाल्या.
'हे एमएमराडीएचं काम असून एक निष्काळजीपणाचे लक्षण आहे. ज्यांनी कोणी संबंधितांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिले, याची माहिती मला मॅडमकडूनच मिळाली की, कालच मॅरिफिट वॉलचे काम करण्यात आले होते. तसेच बॅरिकेट्स इतर सुरक्षिततेचा पाठपुरावा केला की नाही, जर नसेल केला तर रस्त्यावर सुरु असलेली वाहतूक त्यांनी थांबवणे गरजेचे होते'.
'एकाचा दुर्दैवी मृत्यू'
दरम्यान 'चौघेजण गंभीर जखमींपैकी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच इतर तिघांवर उपासना मल्टिस्पेशलिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत', अशी माहिती मुंबई महापौर रितू तावडे यांनी माहिती दिली.
हे ही वाचा : वंदे भारत रेल्वेच्या शौचालयात साप ठेवणारा आरोपी मुंब्रा येथून अटक, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद
'मुंबईतील लोकांची सुरक्षितता फार महत्त्वाचा विषय'
'मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगलं करायचं आहे, त्याआधी आपल्या मुंबईतील लोकांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा विषय आहे. हे काम ज्यांना मिळतंय त्यांनी हे नियम फॉलो करावे अशी तरी माझी प्राथमिकता राहील', अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली.
ADVERTISEMENT











