तारक मेहता…फेम नट्टू काकांचं वृद्धापकाळाने निधन

तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही सिरीअलमध्ये नट्टू काका ही भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांचं आज निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर केमोथेरपी व इतर उपचार सुरु होते. आज (रविवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:22 PM • 03 Oct 2021

follow google news

तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही सिरीअलमध्ये नट्टू काका ही भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांचं आज निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर केमोथेरपी व इतर उपचार सुरु होते.

हे वाचलं का?

आज (रविवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते गेले काही दिवस तारक मेहताच्या सेटवर दिसले नव्हते, ते ७७ वर्षांचे होते. नट्टू काकांच्या निधनामुळे संपूर्ण मालिकेतील कलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गुजराती थिएटर, अनेक चित्रपटांमधून घनश्याम नायक यांनी भूमिका केल्या आहेत. परंतू संपूर्ण देशभरात त्यांच्या नट्टू काका या भूमिकेला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली. आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे ते भूमिकेत जान आणायचे.

नट्टू काकांच्या निधनाच्या बातमीवर सहकलाकारंनी शोक व्यक्त केला आहे. रोशन भाभी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेही आपल्यासाठी ही अत्यंत दुःखद बातमी असल्याचं म्हटलंय. तारक मेहता मालिकेत त्यांच्या पुतण्याची भूमिका करणारा बागा म्हणेच तन्मय वेकेरियानेही आपला शोक व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा सेटवर येऊन काम करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांची तब्येत सुधारत नव्हती. ते एखाद्या हिऱ्यासारखे होते. त्यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झालंय.

    follow whatsapp