Shivsean MNS Yuti : मुंबईतील वरळीत 24 डिसेंबर (बुधवारी) रोजी नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची अधिकृत युती झाली आहे. ही युती मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राची ओळख पुन्हा एकदा नव्याने करून दिली. ते म्हणाले की, 'आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठीच'. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील युतीबाबत भाष्य केलं. तेव्हाच त्यांनी सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीची देखील आठवून करून दिली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Raj-Uddhav Thackeray: मराठी माणसांच्या मनातला 'तो' क्षण, राज-उद्धव यांची युती जाहीर!
मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीवरून काय म्हणाले राज ठाकरे?
काही महिन्यांपूर्वी महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून भाष्य केलं होतं. ते म्हणाले की, मी त्या मुलाखतीत म्हणालो होतो की, 'कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय', असं म्हणत त्यांनी युतीबाबत हिरवा कंदील दर्शवला.
कोणाला किती जागा?
राज ठाकरेंनी कोणाला किती जागा दिल्या जातील याबाबत काहीही सांगणार नसल्याचं वक्तव्य केलं आणि त्यांनी स्मित हास्य केलं. जेव्हा जागा वाटपाबाबत बोलू तेव्हाच अधिकृत निर्णय घेतला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. नंतर त्यांनी, 'लहान मुलांना पळवणारी एक टोळी आली आहे, तशीच आणखी दोन राजकीय टोळ्या आहेत त्या राजकीय पक्षातील मुलं पळवतात,' असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोपरखळ्या मारल्या. नंतर युतीची देखील घोषणा केली.
युतीची घोषणा करताना ते म्हणाले, 'आम्ही जाहीर करतो की, मुंबईत ज्याप्रमाणे युती जाहीर करण्यात आली होती तशी; युती इतरही ठिकाणी केली जाईल ते तेव्हाच सांगण्यात येईल'. काही पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबाबत काही पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, 'उत्तर देवांना द्यावीत दानवांना नाही', असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे अस्त्र ओढले.
हे ही वाचा : नवरा-बायको एकत्रच गेले बाथरूममध्ये, बंद दाराआड नेमकं घडलं तरी काय की दोघांचाही गेला जीव?
'मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच होणार'
पुढे ते असे म्हणाले की, 'मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तेही आमचाच' (ठाकरे युतीचा) असं त्यांनी ठणकावून सांगितलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, 'भाजपमध्ये गेलेल्या काही नेत्यांना जे सुरु हे ते पटत नाही, कदाचित ते देखील पुन्हा येऊ शकतात'.
ADVERTISEMENT











