सरकारकडे पैसे नाही, कर्ज काढून सरकार पगार देत आहे – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महत्वाचं विधान केलं आहे. सरकारी तिजोरीत पैसे नाहीत, सरकार कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार देत आहे. त्यामुळे इमारतीमधल्या रहिवाशांनीच पुनर्विकास करण्याची तयारी ठेवावी असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी निधीटंचाईचा पाढाच वाचला. गेल्या काही दिवसांत उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींचे स्लॅब कोसळत १२ […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:07 AM • 03 Jul 2021

follow google news

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महत्वाचं विधान केलं आहे. सरकारी तिजोरीत पैसे नाहीत, सरकार कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार देत आहे. त्यामुळे इमारतीमधल्या रहिवाशांनीच पुनर्विकास करण्याची तयारी ठेवावी असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी निधीटंचाईचा पाढाच वाचला.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांत उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींचे स्लॅब कोसळत १२ जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करत १२२ इमारतींचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या या कारवाईमुळे उल्हासनगर शहरात काही दिवसांपूर्वी संघर्षमय वातावरण तयार झालं होतं. नागरिकांमध्ये पालिकेच्या कारवाईविषयी धास्ती असताना जितेंद्र आव्हाड यांनी एका चर्चा सत्रात भाग घेत रहिवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या.

उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नागरिकांनी धोकादायक इमारतींच्या पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. ज्याला उत्तर देताना आव्हाडांनी, “सरकारकडे पैसे नाही. सरकार कर्ज घेऊन पगार देत आहे त्यामुळे सरकारकडून अपेक्षा करू नका. मी सरकारचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आलो आहे. मी तुमचा मुद्दा नगरविकास मंत्रालयापर्यंत पोहोचेन आणि लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल”, असं आश्वासन दिलं.

यावेळी बोलत असताना आव्हाडांनी निर्वासितांच्या शहरासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज असल्याचं सांगत तुम्हाला कोणीही बेघर करणार नाही याची हमी मी देतो असं आश्वासन नागरिकांना दिलं. भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर अनेक सिंधी समाजातील माणसं भारतात आली. महाराष्ट्रात या व्यक्तींसाठी उल्हासनगरमध्ये वसाहत करण्यात आली आहे. उल्हासनगर शहराचं नवं डेव्हलपमेंट मॉडेल बनणं गरजेचं असल्याचंही आव्हाड यावेळी म्हणाले.

तारेवरची कसरत

    follow whatsapp