समीर वानखेडेंच्या बदनामीसाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली-क्रांती रेडकर

समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली असा दावा करत क्रांती रेडकरने एक ट्विट केलं आहे. तसंच या ट्विटमधून तिने नवाब मलिक यांना टोला लगावला आहे. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर धाड टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. त्यानंतर 6 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:08 AM • 18 Nov 2021

follow google news

समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली असा दावा करत क्रांती रेडकरने एक ट्विट केलं आहे. तसंच या ट्विटमधून तिने नवाब मलिक यांना टोला लगावला आहे. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर धाड टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. त्यानंतर 6 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांनी हा सगळा बनाव रचल्याचं म्हटलं होतं.

हे वाचलं का?

6 ऑक्टोबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत रोज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप केले आहेत. त्यानंतर आजही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नवाब मलिक यांनी पहिल्या बायकोला धमकावलं होतं तसंच तिच्या चुलत भावाला ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवलं होता असा आरोप केला आहे. दरम्यान नवाब मलिक यांना समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने उत्तर दिलं आहे.

काय म्हणाली आहे क्रांती रेडकर?

समीर वानखेडे यांची बदनामी करण्यासाठी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्धवट माहिती शेअर केली. एक चूक झाली होती. नंतर त्याची रीतसर दुरुस्ती ज्ञानदेव वानखेडेंनी १९८९ मध्ये सर्व कायदेशीर औपचारिकता आणि प्रक्रियांसह केली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रे स्वीकारली आणि पडताळली आहेत.

समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देणारे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते. ज्यामध्ये त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असे लिहिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिक यांनी आता ही नवीन प्रमाणपत्रे दिली होती.

समीर वानखेडे बनावट कागदपत्रे समोर आणत आहेत. पण त्यांनी जन्मदाखला समोर आणायला हवा होता. हे बनावट आहे आणि आम्ही हे सर्व न्यायालयासमोर ठेवले आहे. समीर वानखेडे बनावट कागदपत्रे दाखवत आहेत. जातपडताळणी अधिकाऱ्यांकडेही त्यांची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंची नोकरी निश्चित जाणार आहे असं नवाब मलिक म्हणाले होते. आता त्या आरोपांना क्रांती रेडकरने उत्तर दिलं आहे.

‘नवाब मलिक कोर्टाला चुकीची कागदपत्रं सादर करून समीर वानखेडेंबाबत दिशाभूल करत आहेत’

आज काय आरोप केला नवाब मलिक यांनी?

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन निशाण्यावर असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंबाबत नवा खुलासा केला. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल माहिती देण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला समोर आणला. मलिक यांनी हे प्रमाणपत्र देऊन वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप केला. नवाब मलिक यांनी सेंट जोसेफ हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूलचे लिव्हिंग सर्टिफिकेट अशी दोन प्रमाणपत्रे सादर केली. ही दोन्ही प्रमाणपत्रे समीर वानखेडे यांची असून, त्यात त्यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले आहे.

    follow whatsapp