Haryana liquor policy: बिअर-वाईन ऑफिसमध्ये मिळणार?, सरकारचं नवं धोरण काय?

हरियाणा (Haryana) राज्यात कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये बसून दारू पिता येणार आहे. सरकारने अबकारी करात (Haryana new liquor excise policy) मोठा बदल केला आहे. या बदलानुसार सरकारने अनेक कार्यालयांना दारू विकण्याची परवानगी दिली आहे.

haryana new liquor excise policy been wine can be served in office

haryana new liquor excise policy been wine can be served in office

मुंबई तक

16 May 2023 (अपडेटेड: 16 May 2023, 01:30 PM)

follow google news

Haryana new liquor excise policy: दारू प्यायचं म्हटलं तर एक खास दिवस शोधून त्यासाठी नियोजन कराव लागतं. ऑफिसमधील (Office) वर्कलोड अथवा बदलत्या शिफ्टमुळे कधी कधी हे प्लान्स देखील फिस्कटतात. त्यामुळे तळीरामांची मोठी पंचाईत होते. पण आता या तळीरामांना राज्य सरकारने (Government) मोठा दिलासा दिला आहे. आता ऑफीसमध्ये कर्मचाऱ्यांना दारू पिता येणार आहे.विशेष म्हणजे दारू घेण्यासाठी बाजारात जाण्याचे कर्मचाऱ्यांचे कष्ट देखील कमी होणार आहेत. कारण ऑफीसमध्येच दारू मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय़ घेतला असून लवकरच ही योजना अंमलात आणली जाणार आहे. (haryana new liquor excise policy been wine can be served in office)

हे वाचलं का?

कोणत्या राज्याने घेतला निर्णय?

हरियाणा (Haryana) राज्यात कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये बसून दारू पिता येणार आहे. सरकारने अबकारी करात (Haryana new liquor excise policy) मोठा बदल केला आहे. या बदलानुसार सरकारने अनेक कार्यालयांना दारू विकण्याची परवानगी दिली आहे. या परवानगीनुसार ज्यामध्ये कमी अल्कोहोल आहेत,अशाच बियर्स आणि वाईन्स कार्यालयाच्या कॅटीनमधून विकता येणार आहेत.

हे ही वाचा : बायको दिरासोबत नाचली, अन् भर मंडपात पतीने दोन्ही भावांना मारून टाकलं!

या कंपन्यांनाच मंजुरी

राज्य सरकारच्या नवीन धोऱणानुसार, ज्या ऑफिसमध्ये किमान 5 हजार कर्मचारी काम करतात आणि त्या ऑफिसचे किमान कव्हर क्षेत्र 1 लाख स्क्वेअर फुट आहे. अशा ऑफिस परीसरात बियर अथवा वाईन पिता येणार आहे. राज्याच्या नवीन अबकारी करानुसार, (Haryana new liquor excise policy) कपन्यांना यासाठी वार्षिक 10 लाख रूपये द्यावे लागणार आहेत. वरील नमुद नियमानूसार कंपन्यांना लायसेन्स मिळणार आहे.

वाईन आणि बिअर होणार स्वस्त

हरियाणा सरकारचा नवीन अबकारी कर जुन 2023 पासून लागू होणार आहे. यायाच अर्थ कंपन्या कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासून ऑफिसमधील कॅंटीनमध्ये दारू पिण्याची सुविधा देऊ शकतो. याचसोबत राज्य सरकारने बीयर आणि वाईनवरील एक्साईज ड्यूटी देखील कमी केली आहे.याचाच अर्थ पुढील महिन्यापासून हरियाणात बीयर आणि वाईनच्या किंमती कमी होणार आहेत.

हे ही वाचा : बायकोशी फोनवर बोलण्यावरुन दोन भावांवर चाकू हल्ला, एकाचा जागीच मृत्यू

बार लायसन्सही स्वस्त होणार

हरियाणा सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अबकारी कर 2023-24 धोरणाला मंजूरी दिली. नवीन धोरण लागू झाल्यानंतर फक्त बीयर आणि वाईनच स्वस्त होणार नाही आहे, तर रेस्टॉरंट, पब आणि कॅफेसना बार लायसन्स घेणे देखील स्वस्त होणार आहे. हरियाणाच्या गुरूग्राम भागात अनेक मोठी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. या कपन्यांना सरकारचे हे धोरण आवडू शकते.

    follow whatsapp