महाराष्ट्रातल्या मास्क सक्तीबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

मुंबई तक

• 10:19 AM • 27 Apr 2022

देशात कोरोनाचे सक्रिय रूग्ण वाढत आहेत. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मास्क सक्कीबाबत राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले आहेत राजेश टोपे? “देशात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या वाढली आहे. मात्र राज्यात तूर्तास […]

Mumbaitak
follow google news

देशात कोरोनाचे सक्रिय रूग्ण वाढत आहेत. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मास्क सक्कीबाबत राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत राजेश टोपे?

“देशात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या वाढली आहे. मात्र राज्यात तूर्तास काही काळजीचं कारण नाही. मात्र ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी मास्क सक्ती पुन्हा सुरू करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते निर्णय घेतील.” असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. एवढंच नाही तर काळजी घेण्याचं आणि दुर्लक्ष न करण्याचंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

आणखी काय म्हणाले राजेश टोपे?

महाराष्ट्र सध्या सेफ झोनमध्ये आहे. घाबरण्याचं किंवा काळजीचं कारण नाही. सध्या ९२९ केसेस सक्रिय रूग्ण आहेत. एक काळ असा होता की आपण ६५ ते ७० हजार केसेस पाहिल्या आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रात तसा चिंतेचा विषय नाही. महाराष्ट्रात दर दहा लाखांमागे सात रूग्ण आढळत आहेत. आम्ही टेस्टिंग वाढवण्यावर भर देत आहोत. ट्रॅकिंगही करणार आहोत आणि गरजेप्रमाणे ट्रिटमेंटही करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या आपल्या देशात ओमिक्रॉनच सर्वदूर आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणार आहोत हेदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

६ ते १२ या वयोगटाचं लसीकरण करण्याची संमती केंद्र सरकारने दिली आहे. या वयोगटाला लसीकरण करण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे.लवकरच त्याची नियमावली केंद्र सरकारकडून येईल त्यानंतर आम्ही हे लसीकरण करणार आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. आपल्याला पुढच्या दोन गटांचं म्हणजे १३ ते १५ वयोगट आणि १५ ते १७ वयोगट यांचंही प्रमाण थोडं कमी आहे. तेही वाढवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. मास्कमुक्ती झालेली नाही. मात्र मास्क सक्ती आपण अद्याप लागू केलेली नाही. ती करावी का याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp