उस्मानाबादमध्ये उष्माघातामुळे एका शेतकऱ्याला त्याचा प्राण गमवावा लागला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमानाचा पारा ४० च्याही पुढे गेला आहे. भर दुपारी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला उन्हाचा तडाखा बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील हासेगाव केज या ठिकाणी हा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. उन बरंच लागल्याने त्याने पाण्याचा घोट घेतला आणि त्यानंतर लगेचच त्याला चक्कर आली.
ADVERTISEMENT
लिंबराज सुकाळे वय वर्ष 50 या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी प्यायल्यानंतर या शेतकऱ्याला उष्माघाताचा झटका बसला. उपचारासाठी कळंब मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केलं. गेल्या 6 दिवसापासून उन्हाचा पारा गेला आहे चाळीशीच्या पार आहे. उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
वास्तूशांती समारंभासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
नेमकी काय घडली घटना?
हासेगाव केज येथील शेतकरी लिंबराज सुकाळे हे गुरूवारी दुपारी भर उन्हात काम करत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांना तहान लागली. त्यामुळे काम थांबवून ते पाणी प्यायले. यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या कुटुंबीयांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी कळंब येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासलं असता रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे हे सांगितलं. लिंबराज सुकाळे हे यंदाच्या मोसमातील उष्माघाताचे उस्मानाबाद जिल्ह्यातले पहिले बळी ठरले आहेत.
ह्रदयद्रावक! शेतकरी दाम्पत्यानं एकाच झाडाला गळफास घेऊन संपवलं आयुष्य
जळगावमध्ये एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या 33 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी माळी यांनी दुपारी त्यांना चक्कर आली. त्यानंतर भर उन्हात शेतातील काम केलं होतं. शेतातून काम करून घरी येत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. ३० मार्चला त्यांचा मृत्यू झाला. आता त्यापाठोपाठ राज्यात दुसऱ्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT











