आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक पक्ष विविध प्रकारची युक्ती लढवत असतो. एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने खास शक्कल लढवली आहे. असे काही उपक्रम आखले जातात ज्यांना यश मिळतंच. शिंदे गटाने असाच एक खास प्रयत्न केला आहे. जो चांगलाच चर्चेत आहे. स्वयंचलित कॉलिंग यंत्रणा आणि एक नंबर दाबला की सदस्य नोंदणी होते अशी कल्पना आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आवाहन करतात.
ADVERTISEMENT
स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेत एकनाथ शिंदे काय म्हणतात?
जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय. हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचललं आहे. सुजलाम, सुखलाम महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आपणही माझ्यासोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक १ दाबा असं आवाहन एकनाथ शिंदे करत असल्याचं ऐकू येतं.
एकनाथ शिंदे गटाचा अनोखा प्रयत्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सदस्य नोंदणीसाठी हा अनोखा प्रयत्न आहे. याला किती यश मिळेल हे ठाऊक नाही. मात्र सदस्य नोंदणीसाठी लढवलेली ही शक्कल चांगलीच चर्चेत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने काय म्हटलं आहे?
शिवसेना पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून महाराष्ट्र राज्याचे बेकायदेशीर मुख्यमंत्रीपद बळकावलेले गद्दार एकनाथ शिंदे यांच्या आवाजाचे स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे 911725248275 या नंबर वरुन व्हॉइस Call येत आहेत. कॉल आल्यानंतर एक दाबा असे ते सूचना करत आहेत. एक दाबल्यानंतर आपण प्रणालीद्वारे त्यांच्या मिंधे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होईल.
अशाच पद्धतीची यंत्रणा भाजपाच्या IT विभागाचे यांनी करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता. तरी राज्यातील तमाम शिवसेना सर्व पदाधिकारी सोशल मीडियावरील शिवसैनिक आणि सर्व अंगीकृत संघटना या सर्वांना विनम्र सूचना करण्यात येत आहे आहे की वरील मेसेज पूर्णपणे वाचून आपापल्या विभागातील तळातील गावापर्यंत पोहोचवावा. प्रतिसाद देऊन त्यांच्या सिस्टीमला जॉईन होऊ नये. ही विनंती. असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
