अमित शहा मुंबईमध्ये : देवदर्शन, भेटीगाठींसह राजकीय समीकरणांचा भरगच्च कार्यक्रम

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (4 सप्टेंबर) पासून मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा प्रामुख्याने गणेशोत्सवानिमित्त असल्याचे सांगितले जात असले तरीही राजकीय दृष्ट्याही हा दौरा अनेकार्थांनी महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात नुकतेच आलेले शिंदे-फडणवीस सरकार, मुंबई आणि इतर महापालिका निवडणुका अशा पार्श्वभूमीवर शहा यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. अमित शहांचा मुंबई दौरा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:34 AM • 05 Sep 2022

follow google news

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (4 सप्टेंबर) पासून मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा प्रामुख्याने गणेशोत्सवानिमित्त असल्याचे सांगितले जात असले तरीही राजकीय दृष्ट्याही हा दौरा अनेकार्थांनी महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात नुकतेच आलेले शिंदे-फडणवीस सरकार, मुंबई आणि इतर महापालिका निवडणुका अशा पार्श्वभूमीवर शहा यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

हे वाचलं का?

अमित शहांचा मुंबई दौरा :

  • सकाळी 10 वाजता : सह्याद्री गेस्ट हाऊसवरुन लालबागकडे रवाना

  • सकाळी 10.30 वाजता : लालबागच्या राजाचे दर्शन

  • सकाळी 11 वाजता : लालबागचा राजाहून वांद्राकडे प्रस्थान.

  • सकाळी 11.15 वाजता : वांद्रे येथे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट

  • दुपारी 12 वाजता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट.

  • दुपारी 12 ते 2 : भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन

  • दुपारी 2 वाजता : सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे प्रयाण.

  • दुपारी 2.15 वाजता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.

  • दुपारी 3.35 वाजता : नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.

  • संध्याकाळी 5.50 वाजता : मुंबई विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण

राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रात तीन वर्ष पूर्ण : तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने सेलिब्रेशन

देवदर्शनासह दौऱ्याचे राजकीय अर्थ :

अमित शहा यांच्या दौऱ्याला काही प्रमुख राजकीय अर्थ देखील सांगितले जात आहेत. देशातील सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे फडणवीस यांचे मिशन आहे. सोबतच येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या 18 प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

80 हजार कोटींची संपत्ती असणारे सायरस मिस्त्री कोण आहेत ज्यांना रतन टाटांनी उत्तराधिकारी केलं होतं?

तसेच या निवडणुकांच्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्याचाही शहा यांचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांसह त्यांची बैठकही होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार हे या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या भाजप-मनसे युतीबाबतही जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या युतीबाबतही निर्णय होण्याची शक्यच वर्तविली जात आहे.

    follow whatsapp