विधानसभा निवडणूक : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काय दिला सल्ला?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. अपेक्षेप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विजयाच्या दिशेने आगेकूच केली असून तामिळनाडूतही द्रमूक पक्ष सत्तेत येतो आहे. आसामचा अपवाद वगळता भाजपला फारसं यश हाती लागलेलं नाही. परंतू या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षाला कोणत्याही राज्यात अपेक्षित यश मिळताना दिसलं नाही. केरळ आणि आसाम या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला चांगली […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:39 AM • 02 May 2021

follow google news

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. अपेक्षेप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विजयाच्या दिशेने आगेकूच केली असून तामिळनाडूतही द्रमूक पक्ष सत्तेत येतो आहे. आसामचा अपवाद वगळता भाजपला फारसं यश हाती लागलेलं नाही. परंतू या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षाला कोणत्याही राज्यात अपेक्षित यश मिळताना दिसलं नाही. केरळ आणि आसाम या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करण्याची संधी होती…परंतू इथेही काँग्रेस चांगली कामगिरी करु शकली नाही.

हे वाचलं का?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या झालेल्या अधःपतनाबद्दल प्रतिक्रीया दिली. “कोणताही पक्ष असो तुमच्या सेटअपमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि तो सुधारायचा असेल तर सर्वात आधी तो प्रॉब्लेम आहे हे मान्य करा. तुम्ही आजही काही काँग्रेस नेत्यांशी बोललात तर तुम्हाला लक्षात येईल की काहीतरी बिनसलंय हे त्यांना मान्यच नाही. ते आजही असंच म्हणतात काहीच प्रॉब्लेम नाहीये. सगळं काही चांगलं आहे.” प्रशांत किशोर इंडिया टुडेशी बोलत होते.

काँग्रेस पक्षाला काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला असता, “मी काँग्रेसला सल्ला देणारा कोण आहे?? काँग्रेस १०० वर्षांचा अनुभव असलेला पक्ष आहे. पण जर तुम्हाला भाजपशी दोन हात करायचे असतील तर तुम्हाला मैदानात येऊन लढावंच लागेल. तुम्ही मैदानात आलाच नाही तर तुम्हाला संधी कशी मिळेल. ज्यावेळी तुम्ही लढाईसाठी मैदानात उतरता त्यावेळी तुम्ही जिंकता तरी किंवा हरता तरी. पण आजही अनेक उदाहरण तुम्ही पाहा तुम्हाला हे दिसून येईल की काँग्रेसने ज्या पद्धतीने लढणं गरजेचं आहे तसं ते लढत नाहीयेत”,असं किशोर म्हणाले.

तृणमूल मधला कचरा घेऊन भाजप विजयाची स्वप्न पाहत होतं – प्रशांत किशोर

    follow whatsapp