मुंबई: राज्यात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्याला पावसाने झोडपून काढले आहे. पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे, नाशिक आणि पालघरला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाआहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागलाआहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
पुढील २ दिवस कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती
१४ जुलै
रेड अलर्ट: पुणे, नाशिक, पालघर
ऑरेंज अलर्ट : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ.
येलो अलर्ट: नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, अकोला, वाशिम, औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर.
१५ जुलै
ऑरेंज अलर्ट: पुणे, सातारा, पालघर.
येलो अलर्ट: नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर कलम १४४ लागू करण्यात आला आहे. गड, किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळांवर कलम १४४ लागू केले आहे. पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत असे आदेश देण्यात आले आहेत. पाच तालुके वगळता पुण्यातील सर्व ठिकाणच्या शाळांना तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत पावसाने ८० च्या वर लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात आहे. ठाण्यातही बारावीपर्यंत आज आणि उद्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी असे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
