अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप तसंच विकास बहल यांना इन्कम टॅक्सने मोठा झटका दिलाय. तापसी, अनुराग आणि विकास बहल यांच्या घरी तसंच इतर ठिकाणी इन्कम टॅक्सने छापा टाकला आहे. फॅन्टम फिल्मच्या टॅक्स चोरी संदर्भा ही छापेमारी झाली असल्याची माहिती आहे. तिघांच्याही मुंबईत असलेल्या घरांवर इन्कम टॅक्सने धाड टाकली आहे.
ADVERTISEMENT
इन्कम टॅक्स विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, टॅक्स चोरीच्या प्रकरणात फॅन्टम फिल्मशी निगडीत असलेल्या व्यक्तींवर ही धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये अनुराग कश्यप, तापसी पन्नू तसंच विकास बहल यांचा समावेश आहे. इन्मक टॅक्सची टीम मुंबई, पुणे तसंच इतर 20 जागांवर छापेमारी करतेय. यामध्ये 4 कंपन्यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
