पुण्याच्या नमिता थापर फोर्ब्सच्या यादीत, ठरल्या पॉवरफुल बिझनेस वुमन

मुंबई तक

• 03:55 PM • 08 Nov 2022

Forbes च्या २० आशियाई उद्योजक महिलांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये तीन भारतीय महिलांचा समावेश आहे. विशेष आणि महत्त्वाची बाब ही आहे की पुण्याच्या एमक्योर फार्माच्या इंडिया बिझनेसच्या कार्यकारी संचालक नमिता थापर यांचाही या यादीत समावेश आहे. नमिता थापर यांचं नाव या यादी समाविष्ट झाल्याने पुण्याचं नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर मोठं झालं आहे. आणखी […]

Mumbaitak
follow google news

Forbes च्या २० आशियाई उद्योजक महिलांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये तीन भारतीय महिलांचा समावेश आहे. विशेष आणि महत्त्वाची बाब ही आहे की पुण्याच्या एमक्योर फार्माच्या इंडिया बिझनेसच्या कार्यकारी संचालक नमिता थापर यांचाही या यादीत समावेश आहे. नमिता थापर यांचं नाव या यादी समाविष्ट झाल्याने पुण्याचं नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर मोठं झालं आहे.

हे वाचलं का?

आणखी दोन महिलांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश

नमिता थापर यांच्यासोबत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा सोमा मंडल आणि होनासा कंझ्युमरच्या सह संस्थापिका आणि मुख्य इनोव्हेशन अधिकारी गझल अलघ यांचाही Forbesच्या यादीत समावेश झाला आहे. कोरोना काळात भारतात अनिश्चितता आणि मंदीचं सावट होतं. त्या काळातही महिलांनी व्यवसायात नवी धोरणं गाठत जी उंची गाठली अशा २० महिलांचा Forbes च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी एक नाव पुण्याच्या नमिता थापर यांचं आहे.

कोण आहे नमिता थापर?

नमिता थापर या एमक्योर फार्माच्या इंडियाच्या (Emcure Farms India) कार्यकारी संचालक आहेत. त्यांचा जन्म पुण्यात झाला आहे. पुण्यातील महविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातून त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे. कोरोनाच्या काळात महिलांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांनी नमितासोबत अनकंडिशन युवरसेल्फ नावाचा यूट्यूबवर टॉक शो सुरू केला. इकॉनॉमिक टाइम्स अंडर ४० अवॉर्ड, बार्कले हुरुन नेक्स्ट जेन लीडर अवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स २०१७ वुमन अहेड अवॉर्ड, असे अनेक अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत.

नमिता थापर यांचा विवाह विकास थापर यांच्याशी झाला आहे. विकास थापर हे एक हुशार व्यवसायिक म्हणून ओळखले जातात. नमिता आणि विकास थापर यांना दोन मुलं आहे. नमिता या सोशल मीडियावरही सक्रिय आहे. त्या कायमच त्यांच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मीडिया रिपोर्टनुसार नमिता थापर यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रूपये आहे.

काही महिन्यापूर्वी सोनी टीव्हीवरील शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमात नमिता थापर या परीक्षक होत्या. हा कार्यक्रम भारतातील स्टार्टअप व्यावसायिकांसाठी होता. सोनीवरील या कार्यक्रमामुळे नवोदित उद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढवण्यासाठी निधी दिला गेला. मोठ्या कंपन्यांनी स्टार्ट-अपसाठी मदत करावी आणि त्यात गुंतवणूक करावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश होता. याच कार्यक्रमात नमिता थापर यांनी देखील अनेक लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. 

    follow whatsapp