IPL 2024 : आयपीएलचं उर्वरित वेळापत्रक जाहीर, कधी होणार फायनल?

प्रशांत गोमाणे

• 09:17 PM • 25 Mar 2024

IPL Full Schedule 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता आयपीएलचा फायनल सामना 26 मे रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे जर चेन्नई फायनलमध्ये पोहोचल्यास चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.

 ipl 2024 full schedule playoff venue channai and ahmedabad ipl final date 26 may ma chidambaram stadium

आयपीएलचा फायनल सामना 26 मे रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे.

follow google news

IPL Full Schedule 2024 : यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्या कारणाने आयपीएलच्या सुरूवातीच्या 21 सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र आता लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता आयपीएलचा फायनल सामना 26 मे रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे जर चेन्नई फायनलमध्ये पोहोचल्यास चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. (ipl 2024 full schedule playoff venue channai and ahmedabad ipl final date 26 may ma chidambaram stadium) 

हे वाचलं का?

आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. तसचे यंदा देशभरात लोकसभा निवडणूक असल्या कारणाने पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आयपीएलचे उर्वरीत वेळापत्रक जाहीर झाले आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : राम सातपुतेंचं नेमकं गाव कोणतं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार,आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तर दुसरा क्वालिफायर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

 पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई (चेन्नईने 6 विकेट्सने जिंकला)

2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चंदीगड, (पंजाब 4 गडी राखून विजयी)

3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता, (कोलकाता 4 धावांनी विजयी)

4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता

5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा

6. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.

हे ही वाचा : Lok Sabha Elections 2024 : उमेदवारी मिळताच धानोरकरांनी मुनगंटीवारावर चढवला हल्ला

7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वा.

8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा

9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा.

10. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.

11. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनऊ, संध्याकाळी 7.30 वा.

12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 PM

13. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 31 मार्च, वायझॅक, संध्याकाळी 7.30

14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.

15. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30

16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, वायझॅक, संध्याकाळी 7.30

17. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30

18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30

19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30

20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता

21. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनऊ, संध्याकाळी 7.30

प्लेऑफ सामन्यांची संभाव्य ठिकाणे

अंतिम सामना (26 मे) : एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
क्वालिफायर 1: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
एलिमिनेटर: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
क्वालिफायर 2: एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

यंदाच आयपीएल सीझन देखील 2023 प्रमाणेच होणार आहे. त्यात 74 सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या वेळी आयपीएल 60 दिवस चालले होते. आयपीएल 2024 मध्ये, सामना जिंकणाऱ्या संघाला 2 गुण दिले जातील, तर हरणाऱ्या संघाला कोणतेही गुण मिळणार नाहीत. सामना अनिर्णित राहिल्यास किंवा निकाल न लागल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. ग्रुप स्टेजनंतर प्लेऑफचे आयोजन केले जाईल, असे नियम असणार आहेत. 

    follow whatsapp