Omicron Variant : कोरोनाच्या व्हेरिएंटवर लस किती प्रभावी? लसीकरण झालेल्यांनाही ओमिक्रॉनचा धोका?

मुंबई तक

• 04:13 AM • 30 Nov 2021

ओमिक्रॉन वेरिएंटने जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे, असं म्हणतायत की भारतात ज्या डेल्टा वेरिएंटमुळे कोरोनाची जिवघेणी दुसरी लाट आली, त्यापेक्षा 6 पटींनी जास्त संसर्गजन्य आहे. WHO नेही ओमिक्रॉनला वेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलंय. दक्षिण आफ्रीकेत ओमिक्रॉन वेरिएंटने 200-200च्या घरात या नव्या वेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडलेला असू शकतो की […]

Mumbaitak
follow google news

ओमिक्रॉन वेरिएंटने जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे, असं म्हणतायत की भारतात ज्या डेल्टा वेरिएंटमुळे कोरोनाची जिवघेणी दुसरी लाट आली, त्यापेक्षा 6 पटींनी जास्त संसर्गजन्य आहे. WHO नेही ओमिक्रॉनला वेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलंय. दक्षिण आफ्रीकेत ओमिक्रॉन वेरिएंटने 200-200च्या घरात या नव्या वेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडलेला असू शकतो की आमचं लसीकरण तर झालंय, तरीही आम्हाला ओमिक्रॉन वेरिएंटमुळे पुन्हा कोरोना होऊ शकतो का? याच प्रश्नाचं उत्तर समजून घेऊयात की कोरोना लस या नव्या ओमिक्रॉन वेरिएंटवर प्रभावी आहे की नाही?

हे वाचलं का?

ओमिक्रॉन वेरिएंट नवीन आहे, बोट्सवानामध्ये त्याचा पहिला रुग्ण सापडला, त्याची R value सुद्धा जास्त आहे, जितकी R Value जास्त, तितकं संसर्गाचं प्रमाण अधिक. या नव्या विषाणूत एकूण 30 प्रकारचे म्युटेशन आढळलेत

त्यामुळे ओमिक्रॉनवर वॅक्सीन किती प्रभावी असेल याबाबत काही तज्ज्ञांची मतं जाणून घेऊयात.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या या वेरिएंटमध्ये स्पाईक प्रोटीनमध्ये 30हून अधिक म्युटेशन सापडले आहेत. (म्युटेशन म्हणजे व्हायरसच्या जनुकीय संरचनेत होणारे बदल, विषाणूने बदललेलं रूप, ज्यामुळे अँटीबॉडीजना तो विषाणू ओळखणं कठीण जातं आणि पर्यायाने व्हायरस शरीरात आणखी पसरतो). त्यामुळे म्युटेशन जास्त असल्याने वॅक्सीनचा असर कमी होईल असं गुलेरिया यांचं म्हणणं आहे. त्याच्या या बदलत्या रूपामुऴे टेस्टिंगमध्येही ओमिक्रॉन वेरिएंट चकवा देऊ शकतो.

आयसीएमआरच्या डॉ. समीरन पांडा यांचं म्हणणं आहे की MRna वॅक्सीन (मॉडर्ना, फायजर या वॅक्सीन MRnaच्या आहेत.) ओमिक्रॉन वेरिएंटवर प्रभावी ठरणार नाही. पण याला कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन अपवाद आहे कारण ते शरीराला वेगळ्या पद्धतीने इम्युनिटी देतात, असं पांडा यांचं म्हणणं आहे.

फायजर-बायोएनटेत, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या MRna प्रकारच्या वॅक्सीनने ओमिक्रॉनवर वेगळी किंवा अडव्हान्स लस आणण्याचीही तयारी सुरू केली आहे.

WHO ने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्यांना कोरोनाची लागण आधीच होऊन गेली आहे, अशांना ओमिक्रॉन वेरिएंटमुळे पुन्हा कोरोना होऊ शकतो.

या नव्या व्हेरिएंटचा लसींवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आपल्या तांत्रिक भागीदारांसोबत काम करत आहे.

आता ज्या वॅक्सीन तयार झाल्या आहेत, त्या चीनमधील वुहानमधून जो विषाणू जगभरात पसरला, त्या ओरिजिनल स्ट्रेनला विचारात घेऊन आताच्या लसी तयार करण्यात आल्या आहेत. पण ओमिक्रॉन विषाणूचा स्ट्रेन हा वेगळा आहे. त्यामुळे लस कितपत प्रभावी ठरेल हा प्रश्न आहे.

बोत्सावानामध्ये ज्या चौघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, त्या चौघांचेही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेले होते. तरीही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली. त्यामुळे लसीकरण झालेल्यांनाही ओमिक्रॉन होऊ शकतो, असं बोत्सावानामधील घटनेवरून दिसतं.

अर्थात आताचे तर्क हे प्राथमिक पातळीवरचे आहेत. WHO ने सांगितल्यानुसार सध्या लस ही आजाराचे गंभीर परिणाम होण्यापासून आपला बचाव करत. लस घेतल्यानंतरही कोरोना जर झाला तरी किमान तो गंभीर स्वरूपाचा नसणार, किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे लस घेण्यात हयगय करता कामा नये.

    follow whatsapp