कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सोदने गरीब तसंच अनेक गरजूंना मदत केली. सोनू फक्त लोकांची मदतच करत नाही तर संवेदनशील मुद्द्यांवर त्याची मतं देखील मांडतो. अशातच सोनू सूदने एक ट्विट करत थेट डॉक्टरांना सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, एक साधा प्रश्न आहे, जेव्हा प्रत्येकाला हे माहिती आहे की एक विशिष्ट इंजेक्शन कुठेही उपलब्ध नाही, तेव्हा डॉक्टर लोकांना तेच इंजेक्शन घेण्याचा सल्ला का देत आहेत? रुग्णालयांना देखील हे औषध मिळत नाही तर सामान्य माणसाला हे कुठून मिळेल? लोकांना वाचवण्यासाठी आपण इतर कोणतेही औषध का वापरु शकत नाही? ”
सोनू सूदने हे ट्विट रेमडेसिविर इंजेक्शनबद्दल केलं असल्याचं म्हटलं जातंय. याचबद्दल त्याने डॉक्टरांकडे प्रश्न केला आहे. सध्या सोनू सूदचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. त्याच्या या ट्विटवर यूजर्स ट्वीट करुन प्रतिक्रिया देत आहेत.
कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सोनू निगम पुढे सरसावला; ऑक्सिजन पुरवठ्याची करणार मदत
देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अशाच परिस्थितीत ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिविर इन्जेक्शनचाही तुटवडा भासतोय. यामुळे रूग्ण तसंच त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवरून अभिनेता सोनू सूदने डॉक्टरांना सवाल केला आहे.
ADVERTISEMENT











