साताऱ्यातील बामणोलीचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार जम्मूत अतिरेक्यांशी लढताना शहीद

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले बामणोली येथील जवान प्रथमेश संजय पवार जम्मू-काश्‍मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या रविवारी गावी येणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. ते तीन महिन्यांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ, येथील जवान प्रथमेश संजय पवार वय […]

Mumbai Tak

इम्तियाज मुजावर

21 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:07 AM)

follow google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

हे वाचलं का?

सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले बामणोली येथील जवान प्रथमेश संजय पवार जम्मू-काश्‍मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या रविवारी गावी येणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. ते तीन महिन्यांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते.

सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ, येथील जवान प्रथमेश संजय पवार वय 22 जम्मू-काश्‍मीर मध्ये कर्तव्य बजावत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास अतिरेक्यांची चकमक होत असतानाच हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या रविवारी बामणोली तर्फ कुडाळ गावी येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्यापही मिळाली नाही.

शहीद जवान प्रथमेश संजय पवार हे जिल्हा तीन महिन्यांपूर्वीच बेळगाव येथे ट्रेनिंग पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच शहीद जवान रमेश जाधव यांनी पाहिले होते. हे स्वप्न वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पूर्ण केले .अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश संजय पवार हे देशासाठी शहीद झाले. शहीद जवान प्रथमेश पवार यांचे मावसभाऊ अमोल गंगोत्रे (रा बामणोली तर्फ कुडाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 मे रात्री दहाच्या सुमारास जवान प्रथमेश संजय पवार वय 22 हे रात्री ड्युटीला जम्मू सांबा ब्लॉक परिसरात नेहमीप्रमाणे जॉईन झाले. अचानक अतिरेक्यांची चकमक सुरू झाली.

समोरून दहशतवादी फायरिंग सुरू असतानाच प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश संजय जाधव यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जम्मू मधून बामणोली तर्फ कुडाळ येथे त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

शहीद जवान प्रथमेश पवार लहानपणापासूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये यांनी शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे झाल्यानंतर बारावीपर्यंत पाचवड येथील विद्यालयांमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि तात्काळ आर्मी मध्ये त्यांचे सिलेक्शन झाले. आर्मी मध्ये भरती होऊन अवघे तीन महिन्यात पूर्ण झाले होते .त्यातच देश सेवा बजावत असताना अतिरेक्यांशी लढत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. जावळी तालुक्यातील बामणोली , कुडाळ आणि तालुक्यामध्ये बामणोली येथील जवान शहीद झाले असल्याची माहिती कळताच पूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    follow whatsapp