Pune Crime news: पुणे: पुण्यातील कोंढवा बलात्कार प्रकरणाने शहर हादरून गेलं आहे. मात्र, आता या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तरुणीने संबंधित तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली होती अशी माहिती समोर आली. आता याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण आलं आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत गांभीर्याने दाखल घेतली आहे. खोट्या तक्रारीनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा अपप्रचार करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी, मग मराठी माणसाला परवानगी का नाही? मीरा रोडवर मराठी माणूस पेटून उठला
प्रकरण आलं उघडकीस
रविवारी अमितेश कुमार यांनी याबाबत मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. ते सिंहगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या एका चौकीच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी कोंढवा बलात्कार प्रकरणाचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली होती. तरुणीने असा आरोप केला की, तिच्यावरती एका तरूणाने जबरदस्ती करत तिचे लैंगिक शोषण केलं. पण हे खरं नसून या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा चुकीचा संदेश पसरवण्यात आला, असे त्यांनी म्हटलं. तक्रार दाखल करण्यापूर्वी तरुणीने आपल्या शिक्षिकेकडून मार्गदर्शन घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तरुणीने तक्रार दिली होती की, एका अनोळखी डिलिव्हरी बॉयने पुण्यातील एका हायक्लास इमारतीच्या सोसायटीतील राहत असलेल्या एका फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एक केमिकल स्प्रे तोंडावर मारला आणि तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एवढंच नाही,तर तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून मी परत येईल, अशी धमकी दिली होती. मात्र, अवघ्या 24 तासांतच ही तक्रार खोटी असल्याची माहिती पुणे पोलिसांनी उघड केली. तरुणीने हा बनाव केला असून संबंधित तरुण हा पीडितेच्या ओळखीचा असल्याची माहिती समोर आली.
पुणे पोलीस आयुक्तांनी संबंधित प्रकरणाची माहिती दिली की, तरुणीनं तिच्या मित्राला घरी बोलावलं. त्यानंतर तरुणीच्या संमतीने सेल्फी सेशन केलं. त्यानंतर तरुणीनेच तेच सेल्फी फोटो एडिट केले. त्यानंतर दोघांमध्ये वादाला तोंड फुटले असता, तरुणीने तरुणाविरोधात खोटी तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांचीही परस्पर चौकशी केली. त्यानंतर तरुणीला समुपदेशनासाठी पाठविले गेले.
हेही वाचा : तुमच्याही काळाजाचा थरकाप उडेल.. दीड महिन्याचा मुलाला आईने उकळत्या पाण्यात उकळून काढलं!
शिक्षिकेनं तरुणीला दिलं होतं मार्गदर्शन
अशातच आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण होत आहे. महिलेला तिच्या प्राध्यापक असलेल्या मैत्रिणीने मदत केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा जबाब नोंदवला. या प्राध्यापक महिलेच्या सांगण्यावरून तरुणी तिच्या संपर्कात होती. तक्रार दाखल करण्यापूर्वी तिने शिक्षिकेकडून मार्गदर्शन घेतलं होतं. तपास कसा करावा? पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यावीत? याचं मार्गदर्शन संबंधित शिक्षिकेनं केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
