बेवफा गर्लफ्रेंड! तरुणीने दुसऱ्यासोबत ठेवले लैंगिक संबंध, पहिल्या बॉयफ्रेंडल समजलं.. मग सगळा राडाच!

छत्तीसगढमधील कोंडागाव शहरातील प्रेमात अखंड बुडालेला एक युवक वेडा झाला आणि त्यात त्याने आपल्या आधीच्या प्रेयसीच्या प्रियकरावर हल्ला करत त्याचा खून केला. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.

गर्लफ्रेंडने ठेवले दुसऱ्या तरुणासोबत लैंगिक संबंध ठेवल्याने केली हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

गर्लफ्रेंडने ठेवले दुसऱ्या तरुणासोबत लैंगिक संबंध ठेवल्याने केली हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

08 Jul 2025 (अपडेटेड: 08 Jul 2025, 06:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्तीसगढमधील तरुणाने ब्रेकअपनंतर केला मोठा गेम!

point

प्रेयसीच्या नव्या प्रियकराची केली हत्या

point

नेमकं घडलं काय? सविस्तर जाणून घ्या

Chhattisgarh Crime: प्रेमात व्यक्ती वेडी होते, असं म्हटलं जातं. पण खरंच प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने ब्रेकअप झाल्यानंतर एक चकित करून सोडणारा कारनामा केल्याचं पाहायला मिळालं आहे. छत्तीसगढमधील कोंडागाव शहरातील प्रेमात अखंड बुडालेला एक युवक वेडा झाला आणि त्यात त्याने आपल्या आधीच्या प्रेयसीच्या प्रियकरावर हल्ला करत त्याचा खून केला. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

दुसऱ्या तरुणाशी साधली जवळीक

छत्तीसगढच्या कोंडागाव जिल्ह्यातील बिचपुरी गावाचा रहिवासी असलेल्या विजय कोर्राम नावाच्या तरुणाचे दिनेश्वरी नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांमधील जवळीक ही काही काळापुरतीच मर्यादित राहिली.  दिनेश्वरी विजयपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागली. तिने विजयचा मोबाइल नंबरसुद्धा ब्लॉक केला. याच काळात दिनेश्वरीची भेट भूपेश यादव नावाच्या तरुणाशी झाली आणि चांगली मैत्री होऊन त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. दिनेश्वरी ही भूपेशसोबत वेळ घालवत असल्याचं विजयला कळताच त्याची शुद्ध हरपली. 

रात्री प्रेयसीच्या घरी जाऊन केला मोठा गेम!

आपली प्रेयसी कोणा दुसऱ्या मुलाच्या जवळ गेलेली विजयला सहन झालं नाही. याच रागामुळे विजयने भूपेशची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी विजयने सगळ्या मार्गांवरून तपास करण्यास सुरूवात केली. 23 जून 2025 रोजी रात्री भूपेश दिनेश्वरीच्या घरी गेला होता आणि 24 जून रोजी रात्री सुमारे 2 वाजता विजय लपून दिनेश्वरीच्या घरी पोहचला. त्यावेळी विजयने घराचा मागचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर भूपेश आणि दिनेश्वरी बाहेर येताच विजयने भूपेशवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात भूपेशचा जागीच मृत्यू झाला. या सगळ्या प्रकारानंतर विजय तिथून लगेच पळून गेला. 

हे ही वाचा: वासनेने हपालेला नराधम, डोक्यात फक्त असायचे 'शारीरिक संबंध'.. वासनांध तरूणाचा सुरू हैदोस!

पोलिसांना तपासात मिळाली माहिती

खून झाल्याची माहिती मिळताच कोंडागाव पोलीसांचा तपास सुरू झाला. आरोपीला पकडण्यासाठी त्यांनी सायबर सेलची देखील मदत घेतली. यादरम्यान, पोलिसांनी आसपासच्या परिसरातील 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा अगदी बारकाइने तपास केला. तसेच, विजयचं मोबाइल लोकेशन सुद्धा ट्रेस करण्यात आलं. तपासापदरम्यान, विजय छोटेरेहेगा गावातील जंगलात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच जंगल परिसरात गस्त घातली आणि विजयला अटक केली. चौकशीदरम्यान, हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूसुद्धा विजयकडून ताब्यात घेण्यात आला. 

हे ही वाचा: आईने नाही जणू कसाईच, 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल; 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत...

विजयने गुन्हा केला कबूल 

पोलिसांच्या तपासात विजयने आपला गुन्हा कबूल केला. दिनेश्वरीवर खरं प्रेम करत असल्याचं विजयने पोलिसांना सांगितलं. तसेच दिनेश्वरीने भूपेशसोबत नातं जोडल्याचं कळताच विजयला प्रचंड राग आला. विजयला भूपेशला धडा शिकवायचा होता आणि या रागाच्या भरात त्याने त्याला मारण्याचा कट रचला. संधी मिळताच त्याने भूपेशवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली असल्याचं विजयने पोलिसांना सांगितलं. 

    follow whatsapp