अचानक का ट्रेंड होत आहे ‘कबीर सिंह’ फेम निकिता?

कबीर सिंह फेम अभिनेत्री निकिता दत्ता ही सध्या इंटरनेटवर अचानक ट्रेंड होत आहे. तिचं अचानक इंटरनेटवर ट्रेंड होण्याचं कारण म्हणजे बॉलिवूड गायक आणि तिचा कथित बॉयफ्रेंड जुबिन नौटियाल हा आहे. निकिता आणि जुबिन यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. निकिता आणि जुबिन नेहमी डिनर डेटवर जातात. […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 01:45 AM • 14 Mar 2022

follow google news

हे वाचलं का?

कबीर सिंह फेम अभिनेत्री निकिता दत्ता ही सध्या इंटरनेटवर अचानक ट्रेंड होत आहे.

तिचं अचानक इंटरनेटवर ट्रेंड होण्याचं कारण म्हणजे बॉलिवूड गायक आणि तिचा कथित बॉयफ्रेंड जुबिन नौटियाल हा आहे.

निकिता आणि जुबिन यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

रिपोर्ट्सनुसार, दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

निकिता आणि जुबिन नेहमी डिनर डेटवर जातात. तसेच एअरपोर्टवर देखील दोघं अनेकदा सोबत दिसतात.

या दोघांच्या गाठीभेटी हेच दर्शवित आहेत की, दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत

निकिता दत्ता ही बॉलिवूडमध्ये येण्याआधी मॉडेलिंग करत होती.

निकिताने 2021 साली फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. ती त्यात फायनल राऊंडपर्यंत पोहचली होती.

निकिता दत्ता हिने ‘हम दीवाना दिल’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

2018 साली निकिता ही सुपरहिट सिनेमा ‘कबीर सिंह’मध्ये दिसली होती.

कबीर सिंहमध्ये निकिताने अभिनेत्री जिया शर्मा हिची भूमिका साकारली होती.

या सिनेमात शाहीद कपूरसोबत तिचा छोटाच सीना होता. पण त्यामुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

यानंतर 2021 साली तिने अभिषेक बच्चनसोबत ‘द बिग बुल’ या सिनेमात देखील काम केलं.

    follow whatsapp