अभिनेता कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. द कपिल शर्मा शो मधून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या कपिल शर्मावर चाहते भडकले असून, सध्या त्याला ट्रोल केलं जात आहे. काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्मावर आरोप केला असून, त्यामुळे भडकलेल्या चाहत्यांनी कपिलवर निशाणा साधला आहे. या वादात काही जणांनी सलमान खानलाही ओढलं आहे.
ADVERTISEMENT
काश्मीर फाईल्स चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवरुन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्मावर गंभीर आरोप केला आहे. विवेक अग्निहोत्रीने एक ट्विट करत कपिल शर्माने चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. कारण चित्रपटात कोणत्याही मोठ्या कलाकाराची भूमिका नाही.
विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट वेगाने व्हायरल झालं आणि ट्विटर अनेकांनी यावरून कपिल शर्मावर टीका करण्यास सुरुवात केली. कपिल शर्माला ट्रोल केलं जात आहे. एका व्यक्तीने काश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन कपिल शर्मा शो मध्ये करावं असं म्हटलं होतं. त्यावर चित्रपटात स्टार कास्ट नसल्याने बोलवलं नाही, असं अग्निहोत्रीने म्हटलेलं आहे.
विवेक अग्निहोत्रीचं ट्विट…
‘द कपिल शर्मा शोमध्ये कुणाला बोलवलं जावं, हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि शोच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. बॉलिवूडबद्दल बोलायचं झालं तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, अमिताभ बच्चन यांनी गांधींजीबद्दल एक वाक्य सांगितलं होतं, ‘वो राजा है और हम रंक’. सलमान खान शोचा निर्माता असून विवेक अग्निहोत्रीने अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरही निशाणा साधला.
विवेक अग्निहोत्रीच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकांनी कपिल शर्मावर राग व्यक्त केला. एक यूजरने म्हटलं आहे की, ‘सिनेमात स्टारकास्ट नसल्याने कपिल शर्माने काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या प्रमोशनला नकार दिला आहे. इंडस्ट्रीमध्ये कपिल शर्मा खानच्या किती जवळ आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे.’
दुसऱ्या एक यूजरने थेट कपिल शर्मालाच प्रश्न केला आहे. ‘हे जर खरं असेल, तर मी तुझा तीव्र निषेध करतो. जर खरं नसेल तर या चित्रपटाचं कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशन बघायला आवडेल.’
काहींनी काश्मीर फाईल्स चित्रपट प्रमोट करण्यास कपिल शर्माने नकार दिला असून, शो वर बहिष्कार टाकावा असंही म्हटलं आहे.
‘कपिल शर्माने काश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन करण्याची विवेक अग्निहोत्रीची विनंती नाकारली आहे. चित्रपटात स्टारकास्ट नसल्याचं कारण दिलं गेलं असल्याचं विवेक अग्निहोत्रीने स्वतःच सांगितलं आहे. अनुपम खेर, मिथून चक्रवर्तींपेक्षा मोठ्या स्टारकास्टची गरज आहे का?’, असा प्रश्न एका यूजरने विचारला आहे.
ADVERTISEMENT
