Kolhapur: सत्तराव्या वर्षी वृद्धाश्रमात थाटामाटात पार पडला विवाह!

मुंबई तक

• 01:19 AM • 27 Feb 2023

वृध्दापकाळात जवळच्यांनी वाऱ्यावर सोडलं की, नवरा-बायको एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र, साथीदाराही नसेल तर वृध्दाश्रमाशिवाय इतर पर्याय उरत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घोसरवाड याठिकाणी नवं काहीतरी घडलंय. यामुळे सर्वांना आनंद झाला. जानकी वृद्धाश्रमात दोन वृध्द वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

वृध्दापकाळात जवळच्यांनी वाऱ्यावर सोडलं की, नवरा-बायको एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात.

मात्र, साथीदाराही नसेल तर वृध्दाश्रमाशिवाय इतर पर्याय उरत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात घोसरवाड याठिकाणी नवं काहीतरी घडलंय. यामुळे सर्वांना आनंद झाला.

जानकी वृद्धाश्रमात दोन वृध्द वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले.

त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावून दिलं.

वृध्द नववधू अनुसया शिंदे (वय 70) या मुळच्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील आहेत.

तर, वर बाबूराव पाटील (वय 75) राहणार शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथील आहेत.

दोघंही वृद्ध दोन वर्षांपासून घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात राहतात. ते स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेले होते.

दोघांच्याही साथीदारांचे निधन झाले. एकमेकांच्या आयुष्यातील दुःखाचा पाढा एकत्र वाचता वचता मन जुळले.

अनुसया शिंदे आणि बाबूराव पाटील यांनी लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

दोघांचीही तयारी असल्याने, कायदेशीर सल्ला घेवून वृध्दाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत थाटात लग्न लावून दिलं.

सध्या या वृध्द जोडप्यांच्या लग्नाची खूपचं चर्चा सुरू आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp