कोल्हापूर : जन्मदात्या आईची हत्या करुन शरीराचे अवयव खाणाऱ्या मुलाला फाशीची शिक्षा

मुंबई तक

• 09:26 AM • 08 Jul 2021

जन्मदात्या आईला ठार मारुन तिच्या शरीराचे तुकडे शिजवून खाणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज आरोपी मुलगा सुनील कुचकोरवीला ही शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेसोबतच आरोपीला २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आई अंबाबाईच्या नगरीत अशाप्रकारची क्रूर आणि हिस्त्र घटना या शहराला लांच्छनास्पद असल्याच या सुनावणी दरम्यान न्यायाधीश महेश […]

Mumbaitak
follow google news

जन्मदात्या आईला ठार मारुन तिच्या शरीराचे तुकडे शिजवून खाणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज आरोपी मुलगा सुनील कुचकोरवीला ही शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेसोबतच आरोपीला २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आई अंबाबाईच्या नगरीत अशाप्रकारची क्रूर आणि हिस्त्र घटना या शहराला लांच्छनास्पद असल्याच या सुनावणी दरम्यान न्यायाधीश महेश जाधव यांनी नमूद केलं.

हे वाचलं का?

कोल्हापूरातील कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत मयत यलव्वा कुचकोरवी ही आपल्या मुलासह राहत होती. तिचा मुलगा सुनील कुचकोरवी हा व्यसनाधीन असल्यामुळ तो वारंवार आपल्या आईशी पैशांसाठी भाडंण करत होता. 28 ऑगस्ट 2017 रोजी सुनील कुचकोरवी यानं आईकड दारूसाठी पैशाची मागणी केली. आई पैसे देत नसल्याच्या रागातून चाकू, सूरी अश्या धारदार शस्त्रांनी त्यान निर्दयपणे आपल्या आईचा खून केला.

आईची हत्या केल्यानंतरही सुनील तिकडेच थांबला नाही. त्याने आपल्यातल्या क्रुरतेचं प्रदर्शन करत आईच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याला चटणी, मीठ, तिखट लावून ते शिजवून खाण्याचा क्रूरपणा केला. शाहुपूरी पोलीस ठाण्यात या हत्याकांची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास करुन शाहुपूरी पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं. आज सुनावणीदरम्यान न्यायाधीश महेश जाधव यांनी सुनील कुचकोरवीला दोषी मानत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पैशांसाठी दोन दिवस सुरू होते मृतदेहावर उपचार, सांगलीतला धक्कादायक प्रकार

या खटल्यात सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी पोलिसांची बाजू न्यायालयात मांडली. १२ साक्षीदार तपासल्यानंतर साक्षीदारांच्या साक्षी, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनील कोचकोरवी याला ही शिक्षा सुनावली आहे. यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश परीट, एम एम नाईक यांच सहकार्य लाभल.

    follow whatsapp