मुंबईची कोमल जैन CA परीक्षेत देशात प्रथम

मुंबई तक

• 03:57 AM • 03 Feb 2021

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंट ऑफ इंडियाने ने घेतलेल्या CA च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, मुंबईच्या कोमल जैन या विद्यार्थिनीने नवीन अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमानुसार तामिळनाडूचा इसाकीराज ए. देशात पहिला आला आहे. ICAI ने परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे ज्यात कोमलला ८०० पैकी ६०० गुण […]

Mumbaitak
follow google news

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंट ऑफ इंडियाने ने घेतलेल्या CA च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, मुंबईच्या कोमल जैन या विद्यार्थिनीने नवीन अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमानुसार तामिळनाडूचा इसाकीराज ए. देशात पहिला आला आहे.

हे वाचलं का?

ICAI ने परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे ज्यात कोमलला ८०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत. या परीक्षेत सुरतचा मुदीत अग्रवाल तर मुंबईच्या राजवी नाथवानीने दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. यंदा जुन्या आणि नव्या अशा दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४.५ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

कोमल ही मुंबईत घाटकोपर भागात राहते. २०१९ साली पोदार कॉलेजमधून बी.कॉमची पदवी घेतली. कोरोनाच्या महामारीमुळे सीएची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मी देशात पहिला आल्याचं मला समजलं…हे ऐकून मला खूप आनंद झाल्याचं कोमल म्हणाली. कोमलचे वडील हे निवृत्त अकाऊंटट आहेत तर आई गृहिणी आहे. भविष्यात कोमलला कन्सलटन्सी किंवा फायनान्स अशा क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.

    follow whatsapp