Remdesivir: लोकायुक्तांची BMC ला क्लीन चीट, सोमय्यांचे आरोप ठरले चुकीचे

मुंबई तक

21 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:14 AM)

Lokayukta clean cheat to BMC in remdesivir case मुंबई: मुंबई महापालिकेतील (BMC) कथित कोव्हिड घोटाळा प्रकरणी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र लोकायुक्ताने (Lokayukta) मात्र रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शन खरेदीमध्ये मुंबई महापालिकेला क्लीन चीट (Clean Cheat) दिली आहे. त्यामुळे हा प्रकारे चहल यांच्यासह ठाकरे गटासाठी (Thackeray […]

Mumbaitak
follow google news

Lokayukta clean cheat to BMC in remdesivir case मुंबई: मुंबई महापालिकेतील (BMC) कथित कोव्हिड घोटाळा प्रकरणी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र लोकायुक्ताने (Lokayukta) मात्र रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शन खरेदीमध्ये मुंबई महापालिकेला क्लीन चीट (Clean Cheat) दिली आहे. त्यामुळे हा प्रकारे चहल यांच्यासह ठाकरे गटासाठी (Thackeray Group) देखील मोठा दिलासा मानला जात आहे. (lokayukta clean cheat to bmc in remdesivir injection case kirit somayyas allegations proved wrong)

हे वाचलं का?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबई महापालिका आणि ठाकरे गटावर जोरदार आरोप केले होते. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्नशच्या खरेदी अनियमितता आणि अपारदर्शकता झाल्याचा आरोप त्यांनी अनकेदा केला होता. घोटाळा झाल्याचं म्हणत सोमय्यांनी महापालिका प्रशासनाबाबतची तक्रार लोकायुक्तांकडे केली होती.

दरम्यान, या प्रकरणात पालिकेने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचा निर्वाळा देत लोकायुक्ताने मुंबई महापालिकेला क्लीन चीट दिली आहे.

BJPच्या रडारवर आलेल्या इक्बालसिंग चहल यांचं शिंदेंकडून तोंड भरून कौतुक

लोकायुक्ताने दिलेली ही क्लीन चीट हा एक मोठ दिलासा आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केलेले होते की, कोव्हिड काळात रेमडेसिवीरचा पुरवठा आणि खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला होता. महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीरची वाढती मागणी पाहता त्यावर काही निर्बंध आणले होते. हे इंजेक्शन कोणत्याही डिलर किंवा हॉस्पिटलला थेट न देता FDA च्या माध्यमातून याचा व्यवहार व्हावा किंवा पुरवठा केला जावा असे आदेश दिले होते.

किरीट सोमय्यांनी हाच मुद्दा उपस्थित करत असं म्हटलं होतं की, महानगरपालिकेने FDA कडून रेमडेसिवीर न घेता जे छोटे-छोटे डिलर्स आहेत इंजेक्शन पुरविणारे.. त्यांच्याकडून वाढीव दराने इंजेक्शन खरेदी केले होते. त्यामुळेच यामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

BMC आयुक्त चहल ED च्या रडारवर आलेत, कारण… समजून घ्या प्रकरण काय?

दरम्यान, या प्रकरणी लोकायुक्तांसमोर सुनावणी देखील झाली. मुंबई महापालिकेने आपली बाजूही यावेळी मांडली. या सुनावणीनंतर लोकायुक्ताने आपला निर्णय मुंबई महापालिकेच्या बाजूने दिला आहे.

निर्णय देताना लोकायुक्ताने म्हटलं आहे की, या संपूर्ण प्रकरणात आरोप सिद्ध होत नाहीत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार हा रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीमध्ये झालेला नाही. जे पुरावे किरीट सोमय्या यांनी समोर आणले होते त्या पुराव्यांच्या आधारे कोणतेही आरोप सिद्ध होत नाही. म्हणून रेमडेसिवीर खरेदीमध्ये घोटाळा झाला नाही. असं स्पष्ट मत लोकायुक्ताने यावेळी व्यक्त केलं आहे.

लोकायुक्तांच्या या निर्णयाने मुबंई महापालिकेला दिलासा मिळाला आहे तर किरीट सोमय्यांना मात्र दणका बसला आहे. कारण किरीट सोमय्या हे सातत्याने मुंबई महापालिका आणि ठाकरेंवर या प्रकरणी गंभीर आरोप करत होते. मात्र, आता लोकायुक्तानेच अशा स्वरुपाचा निकाल दिल्यानंतर आता याबाबत किरीट सोमय्या काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp