Mahakumbh Stampede : कुणाची आई गेली, कुणाची पत्नी... गंगेच्या तिरावर नातेवाईकांचा आक्रोष

मुंबई तक

29 Jan 2025 (अपडेटेड: 29 Jan 2025, 11:24 AM)

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभ मेळ्यातील रात्री झालेल्या दुर्घटनेमध्ये 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून, त्यांच्यावर कुंभ परिसरात असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कुंभ मेळा परिसरात चेंगराचेंगरी

point

कुणी आई गमावली, तर कुणी पत्नी गमावली

point

चेंगराचेंगरीमध्ये दगावलेल्या भाविकांच्या नातेवाईंचा आक्रोष

Prayagraj Mahakumbh Stampede : मंगळवारी रात्री प्रयागराजमधील कुंभ मेळ्यात गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी झाली. संगम नाक्यावर गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत अंजाजे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना कुंभ परिसरातील सेक्टर 2 मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

'माझ्या आईचा गुदमरल्याने मृत्यू...

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही पीडितांनी 'आज तक'शी संवाद साधला. बिहारमधील औरंगाबादचे सूरज यादव यांनी सांगितलं की, ते आणि सोबतचे 12-13 लोक गंगेत स्नान करण्यासाठी आले होते. एवढी चेंगराचेंगरी झाली की माझी आई चिरडून मृत्युमुखी पडली.

"माझी बायको दगावली, मी अर्धा तास गर्दीत दाबला गेलो..."

चेंगराचेंगरीच्या घटनेत पत्नीचा मृत्यू झालेले फूलचंद विश्वकर्मा म्हणाले, रात्री गंगेत स्नान करून आम्ही बाहेर पडलो तेव्हा आम्हाला दिसलं की बॅरीकेड/गेट उघडं होतं. दोन्ही बाजूंनी मोठी गर्दी झाली होती. लोक एकमेकांना तुडवत होते. माझी पत्नी तिथेच मरण पावली आणि मी अर्धा तास गर्दीखाली दबून होतो. 

"माणसे एकमेकांना तुडवत राहिली..."

औरंगाबादहून आलेल्या विनय कुमार नावाच्या व्यक्तीनं सांगितलं की, काही लोक घाटाकडे जात होते. तर काही लोक परत येत होते. लोकांनी एकमेकांना ढकलल्यानं कुणीही बाहेर पडू शकलं नाही. तिथे पोलीसही उपस्थित नव्हते. यावेळी गर्दी झालेल्या ठिकाणी लोक खाली पडले आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. लोक उठायचा प्रयत्न करत होते, पण गर्दीत कुणीच त्यांना उचलायला आलं नाही.