Maharashtra Cabinet Expansion चा फॉर्म्युला ठरला?, भाजप-शिंदे गटातील प्रत्येकी ७ जण घेणार शपथ

ऋत्विक भालेकर

• 07:26 AM • 04 Aug 2022

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महिना लोटला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार का लांबत चाललाय, याबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू असतानाच आता शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला समोर आला आहे. दोन्ही बाजूंचे प्रत्येकी ७ वरिष्ठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पहिल्या टप्प्यात […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महिना लोटला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार का लांबत चाललाय, याबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू असतानाच आता शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला समोर आला आहे. दोन्ही बाजूंचे प्रत्येकी ७ वरिष्ठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पहिल्या टप्प्यात होणार आहे अशीही माहिती आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार ५ ऑगस्टला होणार?

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही याबद्दल माहिती दिली आहे. या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं केसरकर म्हणालेले आहेत.

त्यातच आता शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सुत्रांनी सांगितलं. शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही बाजूंचे प्रत्येकी सात आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सुरूवातील वरिष्ठ नेत्यांचा समावेश असणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? दीपक केसरकरांनी सांगितला ‘वार’

भाजपतील कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात मिळू शकते संधी?

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निश्चित माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, भाजपतून कुणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, याबद्दल सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वरिष्ठ आमदारांना स्थान मिळणार असून, यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांना संधी दिली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

शिंदे गटातून कुणाची लागणार मंत्रिपदी वर्णी?

शिंदे गटात अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक असले, तरी सुरूवातीला मोजक्याच लोकांना शपथ दिली जाणार असून, यात दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, संजय सिरसाट, अब्दुल सत्तार आणि बच्चू कडू (अपक्ष) यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ६५-३५ टक्के

सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार शिंदे फडणवीस सरकारमध्ये ६५-३५ टक्के असा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यानुसार ६५ टक्के मंत्रिपदं भाजपच्या वाट्याला येतील, तर ३५ टक्के मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील. या फॉर्म्युल्यानुसार २४ ते २५ मंत्रिपदं भाजपच्या वाट्याला येतील. शिंदे गटाला १५ ते १६ मंत्रिपदं मिळतील.

४३ मंत्रिपदांपैकी साधारण १६ मंत्रिपदं ही शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकतात अशी खात्रीलायक माहिती इंडिया टुडेला सूत्रांनी दिली आहे. ठरवून दिलेल्या निकषानुसार महाराष्ट्रात ४२ ते ४३ मंत्र्यांचं मंत्रिमंडळ आहे.

    follow whatsapp