नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांची फौज मैदानात उतरवूनही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने भाजपची झुंज मोडून काढत सलग तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे. सध्याच्या कलानुसार तृणमूल काँग्रेस २०० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सुवेंदू बॅनर्जी यांच्यात नंदीग्राम मध्ये काटे की टक्कर सुरु आहे. या निकालांनंतर राज्यातील नेत्यांनी ममता बॅनर्जींचं कौतुक करायला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचं कौतुक करत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ममता दीदींचं कौतुक करत विजयाबद्दलल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपण सर्व मिळून जनतेच्या भल्यासाठी आणि महामारीविरोधात लढूया असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही ममता दीदींचं कौतुक करत दीदी ओ दीदी…विजयाबद्दल बंगालच्या वाघिणीचं अभिनंदन अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
भाजपच्या नियोजनाचं कौतुक केलं पाहिजे. कोरोना काळ होता तरीही देशाचे पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले. देशाचे गृहमंत्री गेले. हे सगळं कौतुकास्पद आहे. मात्र पश्चिम बंगाल जिंकणार ममता बॅनर्जीच. कदाचित बहुमत थोडंसं कमी होईल.. मात्र सत्ता ममतांचीच येईल याचा विश्वास आम्हाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंगालमध्ये गेले होते. भाजपला या सगळ्याचा नक्कीच फायदा होईल. संध्याकाळी जेव्हा संपूर्ण निकाल जेव्हा हाती येतील तेव्हा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील याचा विश्वास वाटतो कारण बंगालमधून त्यांना हरवणं सोपं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
