‘आम्हाला 20 ते 25 आमदारांचा छुपा पाठिंबा’, राऊतांना सल्ला देताना बावनकुळेंचं विधान

मुंबई तक

22 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:37 AM)

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, राजकीय परिस्थिती गोंधळलेली. कधी काय होईल, याचा नेम नाही.’ दानवेंच्या याच विधानावर खासदार संजय राऊतांनी बोट ठेवत शिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के पडणार असा दावा केला. या विधानांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना सल्ला दिलाय. सल्ला देतानाच बावनकुळे असंही म्हणाले की, आम्हाला 20 त 25 आमदारांचा छुपा पाठिंबा आहे.’ रावसाहेब […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, राजकीय परिस्थिती गोंधळलेली. कधी काय होईल, याचा नेम नाही.’ दानवेंच्या याच विधानावर खासदार संजय राऊतांनी बोट ठेवत शिंदे-फडणवीस सरकार 100 टक्के पडणार असा दावा केला. या विधानांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना सल्ला दिलाय. सल्ला देतानाच बावनकुळे असंही म्हणाले की, आम्हाला 20 त 25 आमदारांचा छुपा पाठिंबा आहे.’

हे वाचलं का?

रावसाहेब दानवेंच्या विधानाने मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेसह राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना तोंड फुटलंय. दानवेंनी एका कार्यक्रमात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले. संजय राऊतांनीही दावा केलाय की शिंदे-फडणवीस यांचं सरकार जाणार.

या सगळ्या राजकीय गदारोळावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भूमिका मांडलीये. नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘कधी वाटलं होतं का की महाविकास आघाडी सरकार पडेल? मात्र, आमचं हे सरकार पूर्ण वेळ चालणार. सरकार मजबूत आहे. आता आमदारांची संख्या 164 आहे. पुढे 184 पर्यंत जाईल. संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांचे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत.”

राज्यात मध्यावधी निवडणुका?; उद्धव ठाकरेंनंतर रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

याच मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अजूनही वीस पंचवीस आमदारांचं छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये”, असा टोला बावनकुळेंनी राऊतांना लगावला.

“ज्या दिवशी तुम्ही त्यांना धनुष्यबाण दिलं होतं, त्यादिवशी ते माणूस होते. शिवसैनिक होते. निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र, आता ते तुमच्या हुकूमशाहीमुळे उद्ध्वस्त झाले. आता तुम्ही त्यांना रेडे म्हणत आहात. लाखो लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. हे लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेचा अपमान आहे. आता संजय राऊत यांनी अशी भाषा सोडावी आणि पक्ष सांभाळावा”, असा सल्ला बावनकुळेंनी संजय राऊतांना दिला.

“त्यांचा (उद्धव ठाकरे) पक्ष रोज फुटतो आहे. रोज शिंदे गट आणि भाजपकडे त्यांचे लोक चालले आहेत. आमदारांना रेडे म्हणणे म्हणणं बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चार लोक दिसतील. विचारांना तिलांजली देऊन आता उद्धव ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी अबू आजमी किंवा ओवेसींची बैठक घेऊन त्यांच्याशी युती करू शकतात”, अशी टीका बावनकुळेंनी केलीये.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर : पक्ष वाचविण्याची धडपड म्हणतं भाजपची टीका

संजय राऊत दानवेंच्या विधानावर काय म्हणाले?

“रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे”, असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे.

    follow whatsapp