Parbhani Muncipal Corporation : परभणी महापालिका ही राज्याची 'ड' दर्जाची महापालिका आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, परभणी शहराची लोकसंख्या ही 3 लाखांवर पोहोचली होती, याचमुळे महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाने लातूर आणि चंद्रपूरसह परभणीचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले. या महापालिकेची स्थापना ही 2012 मध्ये झाली होती. याच महापालिकेची शेवटची अंतिम निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पनवेल महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने किती जागा जिंकल्या? किती होती शेकापची ताकद? इतिहास घ्या जाणून
याच 2017 च्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत 65 वॉर्डांपैकी 31 वॉर्डमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आली, त्यांनी 18 वॉर्ड जिंकले, तर भाजपला 8 जागा मिळाल्या. शिवसेनेला 6 आणि अपक्षांना 2 जागा मिळाल्या होत्या.
2017 च्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल
पक्ष जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 31
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 18
भारतीय जनता पार्टी 8
शिवसेना 6
अपक्ष 2
एकूण 64
2017 च्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मेना वारपुडकर महापौर म्हणून निवडून आल्या.
मतदार यादीत नाव कसे तपासायचे?
तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
electoralsearch.eci.gov.in या वेबसाइटवर जा.
तुमचा EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाकून शोध घ्या. किंवा तुमच्या वैयक्तिक तपशिलावरून (नाव, जन्मतारीख) शोध घ्या.
हे ही वाचा : ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून मनसेचे 'पाटील' तुफान नाचले, 24 तासात भाजपात निघून गेले!
आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचे बदल
डिजिटल व्होटर कार्ड (e-EPIC): आता तुम्ही तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र मोबाइलमध्ये डाऊनलोड करू शकता, जे भौतिक कार्ड इतकेच वैध आहे.
आधार लिंक: मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे, जेणेकरून बोगस मतदानाला आळा बसेल.
ADVERTISEMENT











