इलाही जमादार यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन

मुंबई तक

• 10:46 AM • 31 Jan 2021

मराठी गझल जिवंत ठेवणा-या मोजक्या गझलकारांमध्ये ज्यांचं नाव सुरेश भटांनंतर आवर्जून घेतलं जातं, अशा इलाही जमादार यांचं आज वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारीच होते. त्यानंतर आज सांगली जवळच्या दूधगाव या आपल्या मुळगावी त्यांना अखेरचा श्वास घेतला. इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. 1964 सालापासून काव्यलेखनाला […]

Mumbaitak
follow google news

मराठी गझल जिवंत ठेवणा-या मोजक्या गझलकारांमध्ये ज्यांचं नाव सुरेश भटांनंतर आवर्जून घेतलं जातं, अशा इलाही जमादार यांचं आज वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारीच होते. त्यानंतर आज सांगली जवळच्या दूधगाव या आपल्या मुळगावी त्यांना अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. 1964 सालापासून काव्यलेखनाला सुरूवात केली. त्यानंतर ते आकाशवाणीत ते सातत्याने काव्यवाचन करत. दूरचित्रवाणीवरच्याही सनक, आखरी इन्तजार अशा काही टेलिफिल्म्सकरिता त्यांनी गीतलेखन केल्याचं सांगितलं जातं. या व्यक्तिरिक्तही काही मराठी आणि हिंदी मालिकांसाठी त्यांनी त्या काळी गीतलेखन केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी होते.

त्यांच्या दोह्यांबद्दल बोलताना त्यांनी एकदा सांगितलेलं की, त्यांच्या एका मित्राने त्यांना अमृतवाणी नावाच्या कॅसेट भेट दिल्या होत्या, त्यात कबीराचे दोहे होते. त्याच काळात कबीराच्या अनेक रचना वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्या वाचनात आल्या. त्याचं प्रचंड वाचन त्यांनी तेव्हा केलं. त्यातूनच त्यांनी कबीराचे दोहे मराठीत आणण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला. आणि 12 हजारहून अधिक दोह्यांचा संग्रह केला. त्यातलं 225 दोह्यांचं पहिलं पुस्तक त्यांनी अवघ्या 32 दिवसांत पूर्ण केलं. ईलाही यांनी त्यांच्या उत्तर काळात हे दोहे रचले.

पण आपल्या सुरुवातीच्या काळात मात्र त्यांची ओळख काव्य आणि गझलांमुळेच निर्माण झाले. गायक भिमराव पांचाळ आपल्या प्रकट कार्यक्रमात इलाही यांच्या गझली आवर्जून घेत. त्याव्यतिरिक्त काही मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाही यांच्या कविता व गझला प्रसिद्ध होतं. त्यानंतर त्यांनी गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठीची गझल कार्यशाळा घ्यायलाही सुरूवात केली. आपल्या काव्यवाचनाचे व मराठी गझलांचे कार्यक्रमही ते करत. ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ अशी त्यांची नावं होती. ‘जखमा अशा सुगंधी’, ‘भावनांची वादळे’, ‘दोहे इलाहीचे’, ‘मुक्तक’, अशी काही त्यांची काव्य आणि गझल संग्रह आहेत. पण आपल्या ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा’ किंवा मग, ‘घर वाळूचे बांधायाचे स्वप्न नसे हे दिवाण्याचे’, किंवा ‘अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर छळेल तुजला तुझी वंचना माझ्यानंतर’, अशा रचनांमधून ते कायम आपल्यातच राहणार आहेत.

    follow whatsapp