अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न; बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळलं

Marathwada Flood and IAS Keerthi Kiran Pujar : एकिकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्थी किरण पुजार नाचगाण्यात मग्न आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Sep 2025 (अपडेटेड: 26 Sep 2025, 12:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जिल्हाधिकारी Keerthi Kiran Pujar यांनी धरला ठेका

point

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम

Marathwada Flood and  IAS Keerthi Kiran Pujar : एकीकडे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. महापूरामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्थी किरण पुजार (Keerthi Kiran Pujar) यांनी तुळजापूरच्या नवरात्र सांस्कृतिक उत्सवात ठेका धरलाय. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या देखील सहभागी झाल्या होत्या. महापूरामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हे वाचलं का?

तुळजापूर मंदिर संस्थानकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन 

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून हा पैसा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आलेला असताना हा महोत्सव सुरु आहे. ज्याच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे त्यांच्याकडून नाचगाण्याचा प्रकार सुर आहे.. हा महोत्सव पुर्वनियोजित असला तरी काही घटना, शेतकरी यांचे दुःख याचे भान राखणे गरजेचे होते. मात्र मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या पैशावर हे सगळं सुरु आहे. तब्बल 8 कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून तुळजापूर नवरात्र उत्सव सुरु करण्यात आलाय. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी काही स्पॉन्सर  आहेत, शिवाय इतर ठिकाणांहून देखील निधी गोळा करण्यात आलाय. उर्वरीत खर्च हा मंदिर संस्थान करणार आहे. मंदिर संस्थान एरवी मदत करत असताना नियमावर बोट ठेवते. मात्र या सांस्कृतिक कार्यक्रमावर करोडो रुपये खर्च करताना दिसत आहे.

अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील 2 लाख 26 हजार 706 हेक्टवरील पिके व फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एक हजार 48 घरांची पडझड झाली असून 207 जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील 363 गावांसह 1 लाख 98 हजार 375 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले आहेत, 15 तलाव फुटले असून 16 गावांचा संपर्क तुटल्याने 498 नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले आहे.

    follow whatsapp