तुंगनाथ मंदिरासमोर अभिनेत्री मीरा जोशीचा जबरदस्त डान्स; इंडिया रेकॉर्डवर कोरलं नाव

मुंबई तक

• 07:48 AM • 04 Apr 2021

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी इंडस्ट्रीत स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर नुकतंच अभिनेत्री आणि कोरियोग्राफर मीरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. High Range Book Of World Records तसंच इंडिया रेकॉर्ड्समध्ये मीराचं नावं लिहिलं गेलं आहे. तुंगनाथ इथल्या भगवान शिव यांच्या मंदिरासमोर डान्स परफॉर्म करणारी पहिली अभिनेत्री म्हणून तिच्या नावाची नोंद करण्यात […]

MumbaiTak
Google CTA

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी इंडस्ट्रीत स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर नुकतंच अभिनेत्री आणि कोरियोग्राफर मीरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. High Range Book Of World Records तसंच इंडिया रेकॉर्ड्समध्ये मीराचं नावं लिहिलं गेलं आहे. तुंगनाथ इथल्या भगवान शिव यांच्या मंदिरासमोर डान्स परफॉर्म करणारी पहिली अभिनेत्री म्हणून तिच्या नावाची नोंद करण्यात आलीये. तुंगनाथ येथे जगातील सर्वात उंचावरील भगवान शिव यांचं मंदिर आहे.

हे वाचलं का?

3470 मीटर इतक्या उंचीवर हे मंदिर आहे. भगवान शिव यांच्या तुंगनाथ मंदिरात जाण्याची मीरा हिची फार इच्छा होती. 16 मार्च रोजी मीराने चंद्रशीला ट्रेकला सुरुवात केली होती. यावर मीरा म्हणते, “मी सकाळी 6.30 वाजता चंद्रशीला शिखरावर पोहोचले होते. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर चंद्रशिला शिखरावर मी 2 डान्सचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. मुख्य म्हणजे सुदैवाने मंदिराचा परिसर बर्फाच्छादित नव्हता. त्यामुळे तातडीने संधी साधत शिव वर्णम गाण्यावर परफॉम केलं.”

मीरा पुढे म्हणते, “डान्स परफॉर्म करताना 6 डिग्री तापमानात असल्याने वातावरण फार थंड होतं. मात्र भगवान शिव यांच्या आशिर्वादामुळे मला माझं ध्येय गाठण्यासाठीफार मदत मिळाली. मला या कार्यात पाठिंबा देण्यासाठी आई वडील तसंच इतर अनेकांचे मी आभार मानते.”

मीरा हिच्या या नृत्याची दखल High Range Book Of World Records आणि इंडिया रेकॉर्ड्सने घेतली. हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केल्यानंतर मीराही फार खूश आहे. लवकरच ती तिच्या डान्सचे व्हिडीयो सोशल मिडीयावर शेअर करणार आहे. यापूर्वी देखील मीराचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मीराने रेल्वे कोचमधील एका रिकाम्या बोगीत ‘छय्यां छय्यां’ या गाण्यावर डान्स केला होता.