Exclusive : कोकणात कमळ कसं फुललं? रविंद्र चव्हाणांनी सांगितली रणनीती

मुंबई तक

02 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:07 AM)

Konkan Teacher Constituency Result : मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result) पहिला निकाल हाती आला आहे. यात भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (MVA) धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp […]

Mumbaitak
follow google news

Konkan Teacher Constituency Result :

हे वाचलं का?

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result) पहिला निकाल हाती आला आहे. यात भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (MVA) धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp dnyaneshwar mhatre gave a shock to mva by winning unexpectedly in konkan teacher constituency)

या निवडणुकीत पसंतीक्रम असल्याने त्याचा निकाल कोटा पद्धतीने ठरवला जातो. त्यानुसार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीचा कोटा मिळविल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि महायुतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत होती. यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, मतदारांनी ज्ञानेश्वर म्हात्रेंना भरभरून मतदान केल्याने त्यांचा पहिल्या फेरीतच एकतर्फी विजय झाला.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजपची नेमकी रणनीती काय होती याबाबत जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना चव्हाण यांनी सविस्तर उत्तर दिली.

कशामुळे हा विजय तुम्हाला मिळाला असेल तुम्हाला वाटतं? तुमचं स्वतःचं प्राथमिक निरीक्षण काय आहे?

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सातत्याने जनसामन्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पूर्ण वातावरण युतीच्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत हेच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे याही निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर 31 शिक्षकांच्या संघटना या सर्वांनी एकत्र येऊन या सगळ्या निवडणुकीमध्ये काम केलं आणि त्यामुळे हा विजय सहजपणे शक्य झाला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जास्त आमदार असलेल्या कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रेंना भाजपमधून उभं करण्यामागे काय रणनीती?

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा मतदारसंघ शिक्षक परिषदेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेल्यावेळची निवडणूक सोडली तर या मतदारसंघात सातत्याने शिक्षक परिषदेचा उमेदवार निवडूण येत आहे. शिक्षक परिषदेला शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते मदत करायचे त्यामुळे इथून शिक्षक परिषदेचा उमेदवार निवडून येत होते.

गेल्या निवडणुकीत शिक्षक परिषेदेचे तीन जण रिंगणात होते. त्यामुळे मतांचं विभाजन झालं. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ही जागा गमवावी लागली. यावेळी असा प्रकार झाला नाही. त्यामुळे सर्व ३१ संघटनासोबत आल्या. ज्ञानेश्वर म्हात्रे हे पूर्वीपासून शिक्षक परिषदेचे काम करायचे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. दिवसरात्र मेहनत केली आणि हे दैदिप्यमान यश खेचून आणलं

कोकणात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं समन्वय कसा ठेवला की भाजपनेच पूर्ण निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे हे यश मिळालं?

कोकणचा मतदार हा पूर्ण हिंदुत्ववादी विचारांचा मतदार आहे. त्याचबरोबर विकासाचाही पगडा आहे. त्यामुळे युतीला मानणारा मतदारसंघ आहे. शिंदे-फडणवीस सरकारही हिंदुत्ववादी विचारांना धरुन चालतं आहे, विकासाचे निर्णय घेतले गेले. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात सरकारला यश आलं. आम्ही सर्व नेतेमंडळींनी अतिशय चांगल्याप्रकारे समन्वय ठेवून, कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे हे यश मिळालं आहे.

जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आणि सीबीएससी शाळांचा प्रश्नांचा काय परिणाम जाणवला का?

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शिंदे-फडणवीस या दोघांनीही जुन्या पेन्शन योजनेबद्दल नकार दर्शविला नव्हता. पण सध्याची राज्याची परिस्थिती आहे, ती त्यांनी सभागृहात मांडली होती. पुढे राज्याची परिस्थिती जेव्हा चांगली होईल, तेव्हा त्याबद्दल विचार करु असं आश्वासन दिलं होतं. पण प्रचार करत असताना विरोधक काही नां काही मुद्दे हातात घेत असतात. त्यामुळेच हा मुद्दा त्यांनी हातात घेतला होता. मात्र कोकणातील मतदारांना वस्तुस्थिती माहित आहे.

सरकार म्हणून आपल्याला माहित आहे विनाअनुदानित शाळांसंदर्भात २०-४०-६० चा निर्णय झाला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २० चं अनुदान देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने काहीच केलं नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ११०० कोटी रुपयांच्या अनुदानाच वाटप झालं होतं. हे सरकार काम करणारं आहे हे मतदारांनाही माहित आहे.

    follow whatsapp